शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विसापुरात वृक्षसंवर्धनाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 00:40 IST

जिल्हा परिषद अंतर्गत वृक्षलागवडीचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृक्षदिंडी काढल्या जात आहेत.

वृक्षदिंडीचे स्वागत : चार तालुक्यांमध्ये जनजागरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत वृक्षलागवडीचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृक्षदिंडी काढल्या जात आहेत. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे वृक्षदिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.वृक्षलागवडीसाठी वृक्षदिंडीचे आयोजन करणारी एकमेव जिल्हा परिषद आहे. वृक्षदिंडीद्वारा गावागावात वृक्षसंवर्धनाचे काम केल्या जात आहे. वृक्षदिंडीच्या तिसऱ्या दिवशी बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यातील गावातून जनजागरण करण्यात आले. वृक्षामुळेच या सृष्टीवरील सर्व जीवजंतू जीवंत असून, या सृष्टीला सुंदर ठेवण्याकरिता गावातील प्रत्येकांनी आपले कर्तव्य म्हणून किमान एक वृक्ष लावून त्याची जोपासना केली पाहिजे. शुध्द हवा चांगले वातावरण निर्माण करण्याकरिता वृक्ष लागवड व संवधार्नाची गरज असून, वृक्षसंवर्धन हेच खरे पूण्याचे काम आहे. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी केले.यावेळी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, महिला बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे उपस्थित होत्या. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, बामणी या गावात वृक्षदिंडीचे स्वागत सभापती गोविंदा पोडे, गटविकास अधिकारी संध्या दिकोंडावार यांनी केले. पुढे दिंडीने राजुरा तालुक्याकडे मार्गक्रमन केले. राजुरा येथे वृक्षदिंडीचे स्वागत पंचायत समितीच्या सभापती जेणेकर यांनी केले. जेणेकर यांनी राजुरा तालुक्यातील वृक्षलागवड व वृक्षसंगोपणाचे पालकत्व स्विकारत असल्याचे जाहीर केले. राजुऱ्यातील चंदनवाही या गावातून वृक्षदिंडी व सभा घेऊन वृक्षरोपनाविषयी ग्रामस्थांना विनंती करण्यात आली . पुढे वृक्षदिंडीचे कोरपना पंचायत समितीचे सभापती शाम रणदिवे व गटविकास अधिकारी संदिप घोन्सिकर यांनी वनसडी या गावात स्वागत केले. या गावात वृक्षदिंडी काढून गृहभेटी घेण्यात आली. शाळेच्या परिसरात सभा घेऊन ग्रामस्थांना वृक्षलागवडीची विनंती करुन, वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली. यावेळी जि.प.चे सदस्य उपस्थित होते.