शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

विसापूरच्या प्रविणाने केली प्रतिकूलतेवर मात

By admin | Updated: June 15, 2017 00:29 IST

घरातील परिस्थिती जेमतेम. वडिल आॅटो चालक. आई मोलमजुरी करणारी, अठराविश्व दारिद्र्याचा सामना करणारे चौघांचे कुटुंब.

दहावीत मिळविले ९५ टक्के गुण : आॅटो चालकाच्या मुलीची भरारीअनेकश्वर मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : घरातील परिस्थिती जेमतेम. वडिल आॅटो चालक. आई मोलमजुरी करणारी, अठराविश्व दारिद्र्याचा सामना करणारे चौघांचे कुटुंब. झोपडीवजा राहते घर, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने ती दहावीच्या परीक्षेला सामोरे गेली. मंगळवारी लागलेल्या दहावीच्या निकालात भरारी घेत तिने ९४.८० टक्के गुण मिळविले. ही किमया विसापूर येथे राहणारी बल्लारपूरच्या आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलची प्रविणा प्रमोद उमरे या विद्यार्थिनीने केली. बल्लारपूर तालुक्यातील प्रमोद उमरे व त्याची पत्नी विश्रांती दोघेही पदवीधर आहेत. मात्र परिस्थितीच्या तगाद्यामुळे जीवनात संघर्ष आला. प्रमोदच्या नशिबी आॅटो तर विश्रांतीच्या पदरात मोलमजुरी आली. तरीही दोन मुलीवर त्याचे जीवापाड प्रेम. मोठी मुलगी प्रविणा व धाकटी मुलगी अनुजा यांना शिक्षणाची आवड असल्याने पदरमोड करून शिक्षणाचे धडे दिले. प्रविणा ही पहिल्या वर्गापासून बल्लारपूर येथील आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. प्रविणाला घरातील परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे अभ्यास करताना तिने प्रयत्नाला इच्छाशक्तीचे बळ दिले. काळोख्या रात्रीनंतर सोनेरी पहाट आपली वाट पाहते. याप्रमाणे ध्येयाचे मार्गक्रमण तिने सुरू केले. वेळेचे नियोजन व प्रामाणिक प्रयत्नातून अभ्यासात सातत्य राखले. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत प्रविणाने प्रतिकूल परिस्थितीला बाजुला सारून घवघवीत यश संपादन केले. तिला एकुण ५०० गुणांपैकी ४७४ गुण प्राप्त झाले असून टक्केवारी ९४.८० इतकी आहे. इंग्रजीत १०० पैकी ९०, मराठीत ८६, हिंदी विषयात ८९, गणित विषयात १०० पैकी १००, सायन्स व टेक्नालॉजी १०० पैकी ९७ तर सामान्य विज्ञान विषयात १०० पैकी ९८ गुण तिने मिळविले आहे. आई-वडिलांच्या ईच्छापूर्तीसाठी होणार डॉक्टरप्रविणाच्या आईवडिलांचे जीवन कष्टमय आहे. परिस्थितीने तसे वळण दिल्याने पदवीधर असूनही त्यांना नोकरी मिळविता आली नाही. उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर असताना आईवडिलांची मुलीच्या शिक्षणासाठी धडपड सुरू आहे. परिस्थितीचे अपयश पचवून नशिबाला दोष न देता प्रयत्नरत राहून शिक्षणानाला परिश्रमाची जोड देणाऱ्या आईवडिलांच्या ईच्छापूर्तीसाठी व सामाजिक ऋण फेडण्यासाठी समाजसेवा हातून घडावी म्हणून प्रविणाने भविष्यात डॉक्टर होण्याची ईच्छा बाळगून आहे. त्यासाठी ती आतापासून तयारीला लागली आहे.दृढ निश्चयातून गाठले यशबल्लारपूर येथील आयडीयल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रविणा उमरे पहिल्या वर्गापासून शिक्षण घेत आहे. तिचा शैक्षणिक प्रवास परिस्थितीच्या कधी आड आला नाही. दृढ निश्चिय बाळगून शैक्षणिक सत्रातील अभ्यासात तिने सातत्य राखले. काही काळासाठी शिकवणी लावली. एकाच शाळेत असणाऱ्या प्रविणा आणि अनुजा दोन्ही बहिणी अभ्यासात एकमेकींच्या मदतीला होत्या. अनुजा ही त्याच शाळेत नवव्या वर्गात असून तिही कुशाग्र बुद्धीची आहे. तिच्याकडूनही बहिणीसारखीच प्रगतीची अपेक्षा आहे.