विसापूर फाट्याच्या बाजूला लागून असलेल्या झुडपी जंगलात मोठ्या लांब वृक्षांमुळे या परिसराला चांगले सौंदर्य प्राप्त झालेले आहे आणि त्यामुळे अनेक कुटुंब प्रवासादरम्यान येथे थांबून दुपारची न्याहारी (जेवण) करतात.
परिसर अल्हाददायक असल्याने थोडा विसावासुद्धा घेतात; परंतु काही दिवसांपासून या परिसरात महाविद्यालयाचे तरुण- तरुणींचे वास्तव्य वाढल्यामुळे व ते नको त्या स्थितीत पाहायला मिळत असल्यामुळे हा परिसर आता वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध होऊ लागलेला आहे.
येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होऊ लागलेला आहे. सायंकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचा येथेच ठिय्या राहत असल्यामुळे पुढे कोणती दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी आहे.