वनसडी : चंद्रपूर जिल्ह्यातील आंध्र सीमेवरील काही गावांपर्यंत अद्यापही दूरसंचार क्रांती पोहचली नाही. मात्र शेजारच्या राज्यातील मोबाईल टॉवरने या भागात खासगी कंपनीची मोबाईल सेवा उपलब्ध करून दिली आहे.कोरपना- जिवती तालुक्यातील कोट्टा, परमडोली, शंकरलोधी, मुकदगुडा, भोलापठार, थिप्पा, मांगलहिरा, उमरहिरा, शिवापूर, खडकी, जांभुळधरा, टांगाळा या अतिदुर्गम भागात आजही पाहिजे तशा सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. स्वातंत्र्याची अनेक दशके लोटली.मात्र विकासाची गती संथच आहेत. त्यामुळे मोबाईल सेवा तर दूरच, या भागात भारतीय संचार निगमने आपले नेटवर्क सुरू केले नाही. महाराष्ट्र- आंध्रसिमेवरील १४ वादग्रस्त गावावर आपला दावा सांगतानाच आता कव्हेरजच्या माध्यमातून हा भाग आंध्राचा तर नाही ना, अशी शंका नागरिकांना येते.या भागात महाराष्ट्राचे मोबाईल सेवेचे जाळे विणने आवश्यक असताना त्याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. या गाव परिसरात महाराष्ट्राने मोबाईल टॉवरची उभारणी करणे गरजेचे आहे. ही काम त्वरीत हाती घेऊन नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील गावांमधील नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)■ महाराष्ट्र वआंध्रप्रदेशाच्या सिमेवर असलेल्या गावांचा प्रश्न गंभीर आहे. ही गावे महाराष्ट्रातील असली तरी आंध्र सरकार या गावांना विविध सोई-सवलती पुरवित आहे. या गावातील नागरिकांना दोनही राज्याचा मोठा आधार आहे. त्यामुळे हे नागरिक दोनही राज्यातील निवडणूक प्रक्रीयेत भाग घेतात. यंदा पार पडलेल्या निवडणुकीतही या गावातील नागरिकांनी मतदान केले.
गावे महाराष्ट्राची कव्हेरज मात्र आंध्रचे
By admin | Updated: May 9, 2014 02:56 IST