शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामरोजगार सेवकाला होणार अटक

By admin | Updated: August 5, 2015 01:17 IST

तालुक्यातील पिंपळगाव (भो.) येथे झालेल्या मनरेगाच्या कामातील भ्रष्टाचारप्रकरणी संबंधित ग्रामरोजगार सेवकाला अटक होण्याची शक्यता आहे.

ब्रह्मपुरी : तालुक्यातील पिंपळगाव (भो.) येथे झालेल्या मनरेगाच्या कामातील भ्रष्टाचारप्रकरणी संबंधित ग्रामरोजगार सेवकाला अटक होण्याची शक्यता आहे. या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अन्य लोकांना वाचविण्यासाठी प्रशासनस्तरावर केविलवाणी धडपड केली जात असल्याने मजुरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणात संबंधित ग्राम रोजगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी ग्रामपंचायतीच्या खुल्या प्रांगणात ग्रामवासीयांसमोर करण्यात आली. चौकशी दरम्यान, गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी २५४ बोगस मजुरांची नावे व त्यांच्या नावावर २ लाख ६४ हजार ९४४ रुपयांची अफरातफर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच या भ्रष्टाचारात सरपंच हेमंत खोब्रागडे, ग्रामसेवक नानाजी मेश्राम, तांत्रिक सहाय्यक बळीराम मैंद, ग्रामरोजगार सेवक दिलीप उरकुडे, ग्राम रोजगार सहाय्यक तुळशिदास उरकुडे यांचाही सहभाग असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. मात्र आता केवळ ग्राम रोजगार सेवकालाच अटक होण्याची चिन्हे असून अन य आरोपी यातून सहिसलामत सुटणार असल्याचे दिसून येत आहे. पिंपळगाव (भो) येथे मनरेगाच्या कामातील भ्रष्टाचाराची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. २५४ मजुरांची बोगस नावे दाखवून २ लाख ६४ हजार ८४४ रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सदर घोटाळ्यातील आरोपींवर जिल्हाधिकारी योग्य कारवाई करून न्याय देतील, अशी अपेक्षा होती. परंतु जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सदर प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. चोर सोडून सन्याशाला फाशी दिल्याचा प्रकार या प्रकरणात झाला असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. (वार्ताहर)