प्रश्नांचा भडीमार : संध्याताई आल्या तशाच गेल्याराजोली : महिनाभरापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे लोकार्पण करण्यासाठी आलेल्या राजोली मारोडा क्षेत्राच्या जि.प. सदस्या तथा विद्यमान जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांना येथील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागुन रस्त्याचे लोकार्पण न करताच माघारी परतावे लागले. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास येथे घडली.राजोली रेल्वे स्टेशन ते गावातील मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या २५० लांबीच्या डांबरीकरणाचे काम गेले अनेक वर्षानंतर प्रथमच करण्यात आले. सदर डांबरीकरणाचे काम अनियमीत असुन निकृष्ठ दर्जाचे असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.सदर कंत्राटदाराने जुन्या रस्त्याची साफसफाई न करता त्यावर सरसकट अप्रमाणित माती मिश्रीत लालगिट्टी पसरली. यावेळी रस्त्यालगतच्या नागरिकांनी यावर आक्षेप घेत काम नियमानुसार करण्यास बजावले असता ‘आम्ही आमचे काम करतो तुम्हाला काय करायचे ते करा’ असे उत्तर देवून रस्त्यावर पसरलेल्या मातीमिश्रीत लालगिट्टीवर पुसटसे डांबर टाकुन त्यावर काळी गिट्टीची चुरी पसरवली. यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेचा दर्जा खालावला असुन अल्पावधीतच ४ लाख १३ हजार ८०५ रुपये किंमतीच्या डांबरीकरणाची खडी उखडली आहे. त्यामुळे या रस्त्याविषयी गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. शनिवारी दुपारी लोकार्पण सोहळ्यासाठी आपल्या समर्थकांसोबत आलेल्या जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांना गावकऱ्यांनी रस्त्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्नाचा भडीमार करून भांबावून सोडले व या डांबरीकरणाच्या कामाची चौकशी करून कंत्राटदार व संबधीत अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी करत निकृष्ठ दर्जाच्या डांबरीकरणाच्या लोकार्पणाचा आयोजित कार्यक्रम हाणुन पाडला.ग्रामपंचायत आणि गावकरी यांना विश्वासात न घेता परस्पर लोकार्पणाचा कार्यक्रम पार पाडून शासनाच्या तिजोरीचा भार हलका करण्याचे काम लोकप्रतिनिधी व जि.प. बांधकाम विभाग करीत असल्याची जोरदार चर्चा गावात सध्या सुरू आहे. (वार्ताहर)स्वगृही मिळाला घरचा अहेरराजोली-मारोडा हे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांचे क्षेत्र आहे. मात्र जेथून त्या जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करतात, त्याच ठिकाणी नागरिकांनी त्यांना आज घरचा हेर दिला. विकास कामातील भ्रष्टाचाराबद्दल आणि कंत्राटदारांना पाठीशी घालण्याबाबत या क्षेत्रात बऱ्याच चर्चा आहेत. तक्रारी करूनही दाद देत नसल्याने ही पाळी आल्याची चर्चा आहे.
रस्त्याचे लोकार्पण गावकऱ्यांनी हाणूून पाडले
By admin | Updated: February 13, 2016 00:38 IST