आॅनलाईन लोकमतजिवती : आजपर्यंत अनेक ठिकाणी जनजागरण मेळावे बघितले आहे. मात्र जिवतीसारख्या दुर्गम तालुक्यातील लांबोरी या गावातील जनजागरण मेळावा हा प्रशंसनीय आहे. त्यातच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून उत्साह दाखविला. अशी एकता गावविकासासाठी दाखवावी, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी केले.जिवती पोलीस स्टेशनच्या वतीने लांबोरी येथे जनजागरण मेळावा नुकताच पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.मेळाव्याला अध्यक्ष म्हणून चंद्रपूरच्या महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार बेंडसे, पंचायत समिती सभापती सुनील मडावी, पंचायत समिती सदस्य अनिता गोतावळे, संवर्ग विकास अधिकारी सुरेश बागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आडकिने, जिवतीचे ठाणेदार रविंद्र नाईकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कुलभूषण मोरे, नगरसेवक अश्पाक शेख, नगरसेवक हरिभाऊ मोरे, निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सुरेश केंद्रे, सुग्रीव गोतावळे, बळीराम देवकते, दत्ता राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. कुलभूषण मोरे यांनी आरोग्याची माहिती देताना स्वच्छता, आहार, याबाबत घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात ठाणेदार नाईकवाडे म्हणाले, पोलीस हे आपले शत्रू नसून मित्र आहेत. उद्भवणाऱ्यां समस्या मन मोकळेपणाने पोलिसांना सांगाव्या, ते मदत करतील, असा विश्वास व्यक्त केला. संचालन पाटणचे पोलीस उपनिरीक्षक सोनोने यांनी केले.यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
गाव विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:41 IST
आजपर्यंत अनेक ठिकाणी जनजागरण मेळावे बघितले आहे. मात्र जिवतीसारख्या दुर्गम तालुक्यातील लांबोरी या गावातील जनजागरण मेळावा हा प्रशंसनीय आहे.
गाव विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र यावे
ठळक मुद्देविलास यामावार : लंबोरी येथे जनजागरण मेळावा, अनेकांची उपस्थिती, विविध कार्यक्रमांची रेलचेल