शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अन् प्रेमनगरातील ग्रामस्थांनी गावच सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:03 IST

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील ग्रामस्थांवर आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे अखेर गावच सोडून देण्याची पाळी आली.

ठळक मुद्देदहा वर्षांची वस्ती क्षणार्धात ओसाड : गावाला पोलीस छावणीचे स्वरुप

शंकर चव्हाण।आॅनलाईन लोकमतजिवती : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील ग्रामस्थांवर आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे अखेर गावच सोडून देण्याची पाळी आली. वाद विकोपाला जाऊन एखादी अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनीच यासाठी ग्रामस्थांचे समुपदेशन केले. त्याला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी हा निर्णय घेत सोमवारी आपले बस्तान सेवादासनगरात हलविले.जिवतीपासून २७ कि.मी. अंतरावर असलेल्या नोकेवाडा ग्रा.पं. मधील प्रेमनगरातील नागरिक उदरनिर्वाहासाठी सेवादासनगरातून स्थलांतरित झाले होते. दहा वर्षांपूर्वी प्रेमनगरात येऊन त्यांनी आपली वस्ती थाटली होती. गाव महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असल्याने नोकेवाडा ग्रामपंचायतींतर्गत प्रेमनगरात सिमेंट रस्ता व पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. आणि आता गावात विजेचे खांबही आले होते. दरम्यान, तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून बंजारा व आदिवासी समाजात वाद पेटला आहे. विशेष म्हणजे, प्रेमनगर गावाची महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा राज्यातही नोंद झाली आहे. ग्रामस्थांची नावेसुद्धा तेलंगणातील मतदान यादीत समाविष्ट झाली आहे. हीच बाब तेलंगणा राज्यातील कोलामा येथील नागरिकांच्या मनात खटकत होती. आता प्रेमनगरातील ग्रामस्थसुद्धा आपल्या आरक्षणाचा फायदा घेत सुविधा घेतील, असा समज झाल्याने तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरात हल्ला चढविला. गाव उठवा नाहीतर घरे जाळू व जिवानिशी मारू, अशा धमक्या दिल्या. याबाबत प्रेमनगरातील ग्रामस्थांनी पोलिसात तक्रार करून संरक्षक मागितले. निवेदन दिल्यानंतर पुन्हा तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरात येऊन गोंधळ घातला. सोमवारपर्यंत गाव न हटविल्यास घरे जाळून टाकू, असा इशारा देत लोकांनी प्रेमनगरातील एका मांडवाला आग लावली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस विभागाने प्रेमनगरात दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त कुमक पाठवून तगडा बंदोबस्त लावला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तेलंगणातील लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा रोष वाढतच असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी प्रेमनगरातील ग्रामस्थांचेच समुपदेशन करीत त्यांना सेवादासनगरात हलविले.