शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी तब्बल सात तास कोळसा वाहतूक रोखून धरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

दिवसेंदिवस कोळशाची ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी ठरत असल्याने परिसरातील गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज वेकोलीतून कोळशाची नियमबाह्य ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. या विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर जुनघरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी गोवरी येथील मुख्य मार्गावर गावकऱ्यांनी वेकोलिची ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखून धरली. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोळसा खाणीतील ओव्हरलोड वाहतुकीमुळे गोवरी-पोवनी-साखरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. दिवसेंदिवस कोळशाची ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी ठरत असल्याने परिसरातील गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज वेकोलीतून कोळशाची नियमबाह्य ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. या विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर जुनघरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी गोवरी येथील मुख्य मार्गावर गावकऱ्यांनी वेकोलिची ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखून धरली. यावेळी ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कावळे, उपसरपंच उमेश मिलमिले, हरिश्चंद्र जुनघरी, ग्रामपंचायत सदस्य चेतन बोभाटे व गावकऱ्यांनी वेकोलि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत वेकोली गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आंदोलन पुन्हा तीव्र करू, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.   सकाळी ६ वाजतापासून गोवरी, पोवनी व साखरी येथील नागरिकांनी सात तास वाहतूक रोखून धरली होती.

नागरिकांनी केले मुंडण ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी गोवरी-पोवनी मुख्य मार्गावर चक्काजाम केले.  वेकोलि प्रशासनाच्या निषेधार्थ नागरिकांनी मुंडन करून जाहीर निषेध नोंदविला.

 

टॅग्स :agitationआंदोलन