शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाने गावकरी संतापले

By admin | Updated: September 1, 2015 00:49 IST

मागील अनेक दिवसांपासून कोठारी परिसरात सतत विजेचा लंपडाव सुरू असल्याने गावकरी त्रस्त झाले होते.

कोठारी : मागील अनेक दिवसांपासून कोठारी परिसरात सतत विजेचा लंपडाव सुरू असल्याने गावकरी त्रस्त झाले होते. अशात २७ ते २८ आॅगस्ट या ४८ तासात सतत वीज खंडीत राहिल्याने व गावात काळोख पसरला असल्याने गर्मीने व डासांच्या प्रकोपाने त्रस्त गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. रात्री ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान गावकऱ्यांनी ३३ केव्ही वीज कार्यालयावर हल्ला चढविला. त्यात नोटीस बोर्डाची तोडफोड व सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की झाली.कोठारी येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे. मात्र निर्माण झाल्यापासून या उपकेंद्राला समस्यांचे ग्रहण लागले. विविध कारणापोटी व जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनास्थेपोटी गावकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडून सदैव त्रास होऊ लागला. या उपकेंद्राकडे कोणतेही अधिकारी लक्ष देत नाहीत. सुरळीत व नियमित वीज पुरवठा करण्यासाठी यंत्रणा तत्पर नाही. कोणताही अधिकारी, इंजीनिअर, लाईनमन, वायरमन मुख्यालयात हजर राहत नाहीत. गावातील वीज समस्येची पूर्तत: करण्यासाठी कुणी जबाबदार अधिकारी हजर राहत नाही. परिणामी सदर उपकेंद्र केवळ वीज वितरण कंपनीची शोभेची वास्तू ठरत आहे.कोठारी वीज उपकेंद्र सुरू झाल्यापासून या उपकेंद्राला बामणीवरुन वीज पुरवठा केला जातो. बामणी येथून कोठारीला नियमित पुरवठा होऊ शकत नाही, त्यामुळे वीज नेहमी खंडीत होत असते. खंडित वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी यांच्याकडे अन्य पर्याय नाहीत. त्यामुळे केवळ एकाच पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. ही समस्या नियमित झाली आहे. तरीही वरिष्ठ वीज अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. गोंडपिपरी, राजुरा, विरूर येथून वीज पुरवठा घेण्यासाठी तजवीज करण्यात आली नाही. परिणामी कोठारी व परिसरातील २०-२५ गावकऱ्यांना सतत वीज समस्येला समोर जावे लागत आहे.मागील एक महिन्याअगोदर विजेची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्याबद्दल ‘लोकमत’ने वृत्तपत्रातून समस्या उचलून धरली. त्यावेळी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या चंद्रपूर येथील कार्यकर्त्यांना कोठारीत पाठवून उपविभागीय वीज अधिकारी कनोजे यांच्याशी बैठक घेऊन यापूढे कोठारीत विजेची समस्या असायला नको. समस्येपूर्वीच आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून वीज अखंडीत सुरळीत पुरवठा केला जाणार, असे अभिवचन दिले. मात्र एका महिण्यात कनोजेचे आश्वासन हवेत विरले. विजेची समस्या जैसे थे आहे. अशात गावकऱ्यांचा संताप शिगेला पोहचून वीज कार्यालयावर हल्ला करण्यात आला. (वार्ताहर)