शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

गावातील ग्रामसभाच सर्वोच्च

By admin | Updated: November 1, 2016 00:52 IST

गाव हाच विश्वाचा नकाशा आहे. गावातील निर्णय गावात घेण्याची गरज निर्माण झाली असून...

देवाजी तोफा यांचे प्रतिपादन : बिबी येथे ‘दिव्यग्राम-२०१६’चे आयोजनकोरपना : गाव हाच विश्वाचा नकाशा आहे. गावातील निर्णय गावात घेण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी ग्रामसभा हे महत्त्वाचे साधन आहे.त्यामुळे गावातील ग्रामसभाच सर्वोच्च असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा येथील प्रसिद्ध समाजसेवक देवाजी तोफा यांनी व्यक्त केले.समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक संस्था बिबीच्या वतीने गावात ‘दिव्यग्राम-२०१६’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. लेखामेंढा हा वनहक्क मिळवलेला देशातील एकमेव गाव आहे. त्यासाठी केलेल्या प्रयत्नाची त्यांनी बिबी गावकऱ्यांना आठवण करून दिली. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्य श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला व शहिदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुण कुलकर्णी होते. उद्घाटन माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष म्हणून समाजसेवक डॉ. गिरीधर काळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक हरीश ससनकर, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, डॉ. श्रीनाथ कुलकर्णी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, पोलीस पाटील राहुल आसुटकर, चिंचोलकर, माजी सरपंच चंद्रकांत झुरमुरे, मुख्याध्यापिका साधना वाढई, ग्रामविकास अधिकारी अरुण वाकुडकर, संस्थेचे सचिव देविदास काळे, वासुदेव बेसुरवार, उपस्थित होते.यावेळी माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, समाजसेवक डॉ. गिरीधर काळे व कवी अविनाश पोईनकर यांचा ग्रामपंचायत बिबीच्या वतीने उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी केले. संचालन व आभार अविनाश पोईनकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचा सत्कारविद्यार्थ्यांसाठी सकाळी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. स्पर्धेत क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सेवार्थ गृप, साई स्पोर्र्टीग क्लब, सेव्हन स्टार स्पोर्र्टीग क्लब, जय शिवशंकर स्पोर्र्टीग क्लब, श्री. गुरुदेव सेवा मंडळ, हनुमान मंदिर समिती, शिवराजे क्रीडा मंडळ, नुरानी संदल कमेटी, श्री. गुरुदेव भारुड मंडळ, नवचैतन्य भारुड मंडळ, क्रांतीज्योत युवा मंडळ, जागृत मंडळ, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व पुतळा समिती, सर्व महिला व पुरुष बचत गट तसेच ग्रामपंचायत बिबीचे सहकार्य लाभले.