शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभाच गावाची संसद - अण्णा हजारे

By admin | Updated: December 2, 2014 23:03 IST

शब्दाने ज्ञान सांगून प्रभाव पडत नाही. त्यासाठी आधी कृती केली पाहिजे. आपण जर तुकडोजी महाराज, तुकाराम दादा, महात्मा गांधी यांचे विचार अंगिकारण्याची प्रतिज्ञा केली तर येत्या पाच वर्षांत

ब्रह्मपुरी : शब्दाने ज्ञान सांगून प्रभाव पडत नाही. त्यासाठी आधी कृती केली पाहिजे. आपण जर तुकडोजी महाराज, तुकाराम दादा, महात्मा गांधी यांचे विचार अंगिकारण्याची प्रतिज्ञा केली तर येत्या पाच वर्षांत विदर्भ बदलून जाईल. शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन अंगिकारायचे असेल तर वाईट गोष्टींचा त्याग करावा लागेल. देश बदलविण्यापूर्वी पहिल्यांदा गावापासून सुरूवात करावी लागेल. डोनेशन किंवा अनुदान देऊन देश बदलता येणार नाही. त्यासाठी उत्तम कार्यकर्ता बनून पुढाकार घ्यावा लागेल. लोकसभा, विधानसभेपेक्षाही ग्रामसभा ही सर्वोच्च आहे. त्यामुळे ग्रामसभा हिच गावाची संसद होय, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. ते कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य जन्मशताब्दी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. अड्याळ (टेकडी) येथे तीन दिवसीय जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता मंगळवारी झाली. या कार्यक्रमासाठी ेसमाजसेवक अण्णा हजारे, सिंधूताई सपकाळ, ुलक्ष्मणदादा नारखेडे, उमेश चौबे, देवाजी तोफा, सत्यपाल महाराज, भाऊसाहेब थुटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भजनाने, श्रमदान करून झाली. दुपारच्या सत्रात समारोपीय कार्यक्रमात सिंधूताई सपकाळ यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, बापाची गरीबी झाकायसाठी मुलीचा जन्म व्हावा, देशाची इज्जत राखण्यासाठी आईचा जन्म व्हावा. दादांनी दिलेला वसा सतत जिवंत ठेवा, असे त्यांनी सांगितले. महिलांना घराबाहेर काढा. त्यांना सक्षम बनवा, असे वेळोवेळी सांगितल्यामुळे महिलांना चांगले दिवस आले आहेत. आत्महत्या शेतकरी करतो. परंतु तो माणुससच असतो. महिला आत्महत्या करीत नाही. कारण ती आई असते, असेही सिंधूताईंनी सांगितले. सत्यपाल महाराजांनी आपल्या भाषणातून बुवाबाजीवर प्रहार केला. देवाजी तोफा, लक्ष्मणदादा नारखेडे यांनीही या समारोपीय कार्यक्रमात विचार मांडले. या कार्यक्रमाला हजारो गुरूदेवभक्त उपस्थित होते. प्रास्ताविक कुंभारे यांनी तर, संचालन रविदादा खळतकर यांनी केले. तीन दिवस चाललेल्या महोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी परिसरातील बहुसंख्य गुरुदेव भक्त उपस्थित होते.(प्रतिनिधी)