शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला कर्मचारी पुरविणारे एक गाव

By admin | Updated: October 25, 2015 00:51 IST

काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते.

नागभीड : काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव या गावाचेही असेच आहे. तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता या गावाची ओळख रेल्वे कर्मचाऱ्यांचे गाव म्हणूनच निर्माण झाली आहे.नवेगाव पांडव हे गाव नागभीडपासून सात कि.मी. अंतरावर आहे. नागभीड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. नागभीड येथूनच गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूरकडे रेल्वे गाड्या रवाना होतात. नागभीडची रेल्वे १०० ते १२५ वर्षांपूर्वीची आहे. त्याकाळी रेल्वेच्या निर्माणाकरिता कामगारांची मोठ्या प्रमाणावर गरज होती. आणि लोकांना कामाची, या गरजेतूनच लोक रेल्वेकडे वळले असावेत.सदर प्रतिनिधीने या गावात जावून रेल्वेत कार्यरत असलेल्या व्यक्तींची माहिती काढली असता ६० ते ७० व्यक्ती आजही रेल्वेत कार्यरत असल्याची माहिती मिळाली. अनेकजण निवृत्त झाले आहेत. निवृत्त लोकांची संख्या लक्षात घेतली तर ही संख्या १०० च्या घरात पोहचते. हे कार्यरत कर्मचारी केवळ नागभीड येथेच कार्यरत नाहीत तर विदर्भ व इतर भागातही कार्यरत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अरुण फुकट, रमेश फुकट, आनंद फुकट, मंसाराम पांडव, रामभाऊ चौधरी, शांताराम लटारे, मनोज आटमांडे, हिवराज कोहपरे, गोपाळा म्हशाखेत्री, थामदेव बोरकुटे, बंडू आटमांडे, मारोती ठाकरे, निरंजन शेंडे, प्रकाश लटारे, सुधाकर पांडव, खेकारे, सुमित पानसे, अनिल रामटेके, भगवान मेश्राम, श्रावण ठाकरे, किसन पांडव, रामेश्वर पांडव, निखिल नवघडे, अशोक उरकुडे, रामटेके, कवलदास बोरकुटे, नवघडे, पांडव, कुडलिक अटमांडे, हरिचंद्र निमगडे, माधुरी रडके, नागोजी रडके, बाबुराव आटमांडे, विठ्ठल तिवाडे, मारोती म्हशाखेत्री, महादेव म्हशाखेत्री, गोपाळा म्हशाखेत्री, मारोतीलाल पांडव, नामदेव आटमांडे, कवडू नवघडे, चंद्रुजी पांडव, रघुनाथ पानसे, पंढरी तिजारे, शशिभूषण रामटेके, दामोदर नवघडे, गुलाब बोरकुटे, श्रीपत बोरकुटे, श्रीराम बोरकुटे आदी रेल्वेत कार्यरत व निवृत्त लोकांची नावे मिळाली. उल्लेखनीय बाब अशी की, अनेक कर्मचारी मृत पावले असून त्याचे कुटुंबीय निवृत्ती वेतन घेत आहेत. निवृत्तीवेतन धारकांचीही संख्याही बरीच आहे. केवळ रेल्वेतच नाही तर शिक्षण आणि प्रशासनाच्या इतर विभागातही या गावातील कर्मचाऱ्यांची संख्या बरीच आहे. गावात कर्मचारी बरेच असल्याने एक सधन गाव अशीही या गावाची ओळख आहे. (तालुका प्रतिनिधी)