शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कधी नकोसे असलेले गाव झाले सोन्यासारखे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

सोनापूर ठरले जिल्ह्यातील पहिले सुंदर गाव नीलेश झाडे गोंडपिपरी : सोनापूर गाव दिसले की हमखास नाकावर रूमाल यायचे. गावाकडे ...

सोनापूर ठरले जिल्ह्यातील पहिले सुंदर गाव

नीलेश झाडे

गोंडपिपरी : सोनापूर गाव दिसले की हमखास नाकावर रूमाल यायचे. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तोबा घाण; मात्र योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने आज गाव सोन्यासारखे झाले आहे. आर.आर.आबा पाटील सुंदर गाव योजनेत गावाने जिल्ह्यातून प्रथम स्थान मिळविले आहे.

गोंडपिपरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोनापूर गाव समस्यांचे माहेरघर होते. अशात ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी गावाचे रूप बदलविण्याचे ठरविले. सरपंच जया सातपुते यांच्या पुढाकारातून गावात अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. ग्रामपंचायतीने गाव स्वच्छता मोहीम हाती घेतली. सोबतच शोषखड्डे, शौचालय बांधकाम, हातपंप खोदकाम, भाजीपाला लागवड, गावातील मुख्य भिंतींवर भिंतीचित्रे, कचऱ्याचे योग्य नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, आंतरजातीय विवाह सोहळा, मादक पदार्थाच्या विक्रीवर आळा घालणे, प्लॅस्टिक बंदी, ग्रामपंचायत पेपरलेस करणे, वृक्ष लागवड, सिंचनाच्या सोयी, नळ जोडणी, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, करमणूक केंद्र अशी अनेक विकासात्मक कामे केल्या गेली. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीला अखेर फळ मिळाले. आर.आर.आबा पाटील सुंदर गाव योजनेत सोनापूरने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

कोट

गावाचा सर्वांगीण विकास करणे त्याचबरोबर गावाची ओळख निर्माण करणे हाच आमचा उद्देश आहे. गावकऱ्यांच्या भरीव सहकार्याने सर्वकाही साध्य झाले आहे.

-जयाताई सातपुते, सरपंच, सोनापूर.

280721\img-20210728-wa0030.jpg

सोनापूर