शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गाव तसं चांगलं, पण वेशीवर टांगलं

By admin | Updated: August 3, 2015 00:46 IST

गावाचा विकास व गावाचे भविष्य घडवण्याची ताकत गावातील नागरिकांमध्ये असते. परंतु पार्टी आणि पक्षाच्या नावाखाली ...

मेंडकी गावाची व्यथा : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षमेंडकी : गावाचा विकास व गावाचे भविष्य घडवण्याची ताकत गावातील नागरिकांमध्ये असते. परंतु पार्टी आणि पक्षाच्या नावाखाली गावातील काही स्वत:ला लिडर म्हणवून घेणारे काही समाजकंटक कार्यकर्ते गावात आपसातच भांडण, तंटे लावत असल्याने विकास कामे रखडली आहेत. या समाजकंटक कार्यकत्यांमुळे आज मेंडकी गावाची प्रतिमा मलीन झाली असून ‘गाव तस चांगलं, पण वेशीवर टांगलं’ अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांतून उमटत आहेत.मागील पाच वर्षापूर्वी मेंडकी गावाची मिरविलेली नावलौकिकता आज संपल्यात जमा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथील ग्रामपंचायतीचा गलीच्छ राजकारण. या राजकारणामुळे मेंडकी गावाचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. विकासाच्या नावाने स्वत:चाच विकास साधणारे येथील काही वक्ते गावात भांडण, तंटे करून स्वार्थी राजकारण करीत असतात. यात मात्र मेंडकी हे गावातील सामान्य नागरिक भरडल्या जात आहे. हे कार्यकर्ते समाज-समाजात गटबाजीचे राजकारण करीत असतात. पाच वर्ष सत्ता भोगायची आणि ग्रामपंचायतच्या मासीक सभेत भांडण, हाणामारी, शिवीगाळ, कार्यक्रमात पक्षीय राजकारण, गाव तोडण्याचा उपक्रम मेंडकी गावात नेहमीच पाहायला मिळते. पण यामुळे आपल्या गावाची आब्रु वेशीवर टांगल्या जाईल याकडे मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. अशा दृष्ट समाजकंटक कार्यकर्त्याकडून मेंडकीचा विकास खुंटत चाललेला आहे. यामुळे मेंडकी हे ‘गाव तस चांगलं, पण वेशीवर टांगलं असे म्हणण्यास वावगं ठरणार नाही. आगामी निवडणुकीनंतर कशी परिस्थिती येणार याविषयी नागरिकांत चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)