शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिल्लीत विदर्भवादी देणार धरणे

By admin | Updated: March 4, 2016 00:56 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिल्लीमध्ये ३१ मार्चला धरणे देण्याचे ठरविले आहे.

३१ मार्चला आंदोलन : भेटीसाठी पंतप्रधानांना मागितली वेळचंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिल्लीमध्ये ३१ मार्चला धरणे देण्याचे ठरविले आहे. या आंदोलनादरम्यान पंतप्रधानांकडे विदर्भाची मागणीसंदर्भातील चर्चेसाठी वेळ मागण्यात आला आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेत अ‍ॅड. वामनराव चटप यानी गुरूवारी चंद्रपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आंदोलनासंदर्भात माहिती देताना अ‍ॅड. चटप म्हणाले, दिल्लीतील जंतर-मंतरवर ३१ मार्चला सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे देण्याचा कार्याक्रम आखण्यात आला आहे. या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना निमंत्रण दिले आहे. या सोबतच लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा, गृहमंत्री राजेंद्रसिंग, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळाच्या भेटीची वेळ मागीतली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी २८ मार्चपासून दिल्लीत थांबून महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या धरणे आंदोलनानिमीत्त जनजागृतीसाठी विदर्भात जिल्हा बैठका सुरु झाल्या आहेत. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी बैठका झाल्या असून चंद्रपुरात ३ मार्चला बैठक पार पडली. ५ मार्चला गोंदीया आणि ६ मार्चला भंडारा येथे बैठक होत आहे. १० ते २५ मार्चपर्यंत विदर्भभर मोठ्या जाहीर सभा आणि तालुका बैठका असा कार्यक्रम आखण्यात आल्याची माजिहती यावेळी देण्यात आली. सत्तेत आल्यावर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यचा शब्द भाजपाने दिला होता. मात्र सत्तेत येऊन दीड वर्ष लोटूनही यावर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. विदर्भवाद्यांनी त्यांच्या घरी जावून जाब विचारण्यचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळजबरीने कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे दिल्लीत जावून धरणे देण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)