शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

विदर्भस्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धेचा समारोप

By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST

नगर परिषद भद्रावतीतर्फे आयोजित विदर्भस्तरीय नगराध्यक्ष सूवर्ण चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोमवारी पार पडला.

व्हॉलीबॉलमध्ये आर्वी पालिका प्रथम : भद्रावती नगर पालिकेचा संघ द्वितीयभद्रावती : नगर परिषद भद्रावतीतर्फे आयोजित विदर्भस्तरीय नगराध्यक्ष सूवर्ण चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोमवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सचिन कुमावत, ठाणेदार अर्जुन बोगे, उमरेड नपचे डॉ.राकेश तिवारी, नगराध्यक्ष रेवतकर, नगराध्यक्षा पुरोहित, नगराध्यक्ष खेडेकर, मुख्याधिकारी विनोद जाधव, न.प. गटनेता नालंदा पाझारे, सभापती मिनल आत्राम, माया नारळे, शोभा सातपुते, उपसभापती माधुरी कळमकर, सभापती प्रमोद गेडाम, शारदा ठवसे, नगरसेवक सुधीर सातपूते, संजय आसेकर, संदीप बडाळकर, विनोद वानखेडे, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, राजू गैनवार, रेखा कुटेमाटे, सीमा पवार, शुभांगी उमरे, आशा निंबाळकर आदी उपस्थित होते.व्हॉलीबॉल स्पर्धेचे सूवर्ण चषक नगर परिषद आर्वीच्या संघाने तर दूसरे बक्षीस नगरपरिषद भद्रावती संघाने पटकाविले. तृतीय बक्षीसाचा मानकरी नगर पंचायत धानोराचा संघ ठरला. क्रिकेट स्पर्धेचे सूवर्ण चषक नगर परिषद आर्वी, द्वितीय ब्रह्मपुरी तर तृतीय बक्षीस सिंदी रेल्वे संघाने पटकाविले. कबड्डी स्पर्धेचे सूवर्ण चषक उमरेड संघाने, द्वितीय वरोरा संघाने तर तृतीय पारितोषिक मूल संघाला प्राप्त झाले. बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम बक्षीस नसरूद्दीन भामाणी, घनश्याम अग्रवार (न.प. कोरची), द्वितीय बक्षीस प्रमोद नागरे व संजय किटे (न.प. आर्वी) तर तृतीय बक्षीस सुनील पवार व येल्लय्या ढासरफ या जोडीने पटकाविले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सचिन सरपटवार, प्रास्ताविक मुख्याधिकारी विनोद जाधव तर आभार प्रफुल चटकी यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)