शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा अणे यांना पाठिंबा

By admin | Updated: March 27, 2016 00:38 IST

अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी घेतलेल्या वेगळ्या राज्याच्या भूमिकेला विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाठिंबा दर्शविला आहे.

विदर्भवाद्यांची बैठक : विदर्भ राज्याला विरोध करणाऱ्यांचा निषेधचंद्रपूर : अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी घेतलेल्या वेगळ्या राज्याच्या भूमिकेला विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाठिंबा दर्शविला आहे. अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ आणि मराठवाडा या प्रदेशाचे वेगळे राज्य व्हावे, अशी भूमिका स्पष्टपणे मांडली. अ‍ॅड. श्रीहरी अणे हे विदर्भवादी आहेत आणि सरकारला हे माहिती होते. त्यामुळे त्यांनी वेगळ्या विदर्भाची किंवा मराठवाड्याची बाजू घेतली. यात त्यांनी काहीही चूक केली नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून गेल्या ५६ वर्षात राज्यकर्त्यांनी विदर्भ व मराठवाड्याकडे सतत दुर्लक्ष केले. त्यांना उपेक्षित ठेवले. नागपूर कराराचे पालन केले नाही. म्हणून वेगळा विदर्भ किंवा वेगळा मराठवाडा राज्य द्या, अशा मागण्या होत आहेत. विदर्भाची मागणी तर १०९ वर्षे जुनी आहे. सर्वच्या सर्व आयोग आणि कमिट्यांनी वेगळ्या विदर्भाचे समर्थन केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली. एवढेच नाही तर महाराष्ट्राचे चार राज्य करावे ही सूचना केली. आरएसएसची हिच भूमिका असताना वेगळा विदर्भ कां दिला जात नाही? हा विदर्भवाद्यांचा प्रश्न आहे. अ‍ॅड. श्रीहरी अणे ही भूमिका मांडत होते. त्याबद्दल भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. पर्यायाने त्यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध केला. त्याचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध करून अ‍ॅड.अणे यांना पाठिंबा दिला आहे. आता अ‍ॅड.अणे वेगळ्या विदर्भ राज्याच्या आंदोलनात भाग घेतील आणि विदर्भ राज्याचे आंदोलन बळकट होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीला किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे, प्रा.एस.टी. चिकटे, शेख मैकू शहाबुद्दीन, डी.के. आरीकर, प्रा.माधव गुरनुले, अरुण धानोरकर, सूर्यभान झाडे, अनवर आलम मिर्झा, यशोधरा पोतनवार, सोमेश्वर येलचलवार, मितीन भागवत, अंकुश वाघमारे, जहीभाई काझी, पांडुरंग गावतुरे, नथमल सोनी, दिवाकर पेंदाम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)