शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी आंदोलक २५ आॅक्टोबरला कोळसा रोखणार

By admin | Updated: October 22, 2015 00:57 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा आणि विदर्भातील जनतेचे वीज बिल निम्मे कमी करा, ...

विदर्भासाठी आंदोलन : वैदर्भीयांचे वीज बिल कमी करण्याची मागणीचंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा आणि विदर्भातील जनतेचे वीज बिल निम्मे कमी करा, या मागणीसाठी २५ आॅक्टोबरला कोळसा रोको आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेतून दिला.२५ आॅक्टोबरच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषकदेत ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून विदर्भ राज्य आंदोलन समिती स्वतंत्र विदर्भासाठी सतत आंदोलने करीत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नागपूर कराराची विदर्भभर होळी झाली. जिल्हास्तरीय धरणे झाले, विदर्भ गर्जना यात्रेने शंभरावर सभा घेऊन जनजागृती केली. राज्यकर्त्यांकडून अद्यापही ठोस आश्वासन मिळालेले नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. विदर्भ हे सक्षम राज्य होऊ शकते. येथील कोळश्यावर पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने चालतात. मात्र येथील शेतकरी अंधारात राहतो. प्रकल्पांच्या प्रदूषणाची झळ येथील नागरिक सोसत असले तरी त्याचा विचार कधीच होत नाही. प्रदुषणाची झळ येथील नागरिकांना बसत असल्याने आणि कोळश्यावर विदर्भाचा हक्क असल्याने विदर्भातील नागरिकांचे विज बिल निम्मे करावे, अशी मागणी असल्याचे चटप यांनी सांगितले. आंदोलनाच्या दिवशी कोळश्याच्या वाहनांची अडवणूक करून राज्य सरकारला संकेत दिला जाणार आहे. विदर्भातील कोळसा वीज प्रकल्पात पोहोचला नाही तर प्रकल्प बंद पडून शकतात, याची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन असल्याचे ते म्हणाले. वणी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत हे आंदोलन होणार असून यात विदर्भातील जनतेने सहभागी होण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली. पत्रकारपरिषदेला किशोर पोतनवार, प्रा. एस.टी. चिकटे, प्रभाकर दिवे, आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)