शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाचविण्यासाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:54 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा, अंधारी व इतर नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा, नद्या वाचवा, शेतकरी, उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा तसेच दुष्काळी कामे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीला घेऊन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात इरई नदीच्या परिसरातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : आंदोलनामुळे प्रशासनाकडून हालचाली सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा, अंधारी व इतर नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा, नद्या वाचवा, शेतकरी, उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा तसेच दुष्काळी कामे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीला घेऊन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात इरई नदीच्या परिसरातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.सकाळी १० वाजतापासून सुरू झालेल्या या आंदोलनाची सांगता सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. यानंतर एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यालगतच्या नद्यांवर बंधारे बांधा आणि पाणी अडवा. राजुरा येथील आदिवासी अल्पवयीन अनेक मुलींवर झालेल्या अत्याचाराची सीबीआय चौकशी झालीच पाहीजे व दोषींना कठोर कार्यवाही झाली पाहीजे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हत्यारा नत्थू गोडसे याला देशभक्त ठरविणाºया आतंकवाद्यांचा गंभीर आरोप असलेली असलेली भाजपची भोपाळची उमेदवार प्रज्ञा ठाकूर हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांचा समावेश असल्याची माहिती आंदोलनकर्ते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.आंदोलनामुळे प्रशासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहे. सिंचन विभागाने बैठक घेतली आहे. पालकमंत्र्यांनी यामध्ये आता पुढाकार घेतल्याची माहिती आहे. लवकरच निधी उपलब्ध होऊन बंधारे निर्मितीला सुरूवात होईल, असे संकेत असल्याचेही पुगलिया यांनी यावेळी सांगितले.राजुरा येथील अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री स्वत: राजुरा येथे भेट देऊन पीडितांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निकालानंतर मुख्यमंत्री केव्हाही येऊ शकते, असेही पुगलिया म्हणाले. या आंदोलनात युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, दवेंद्र बेले, जि.प. सदस्य गोदरू जुमनाके, शिवचंद काळे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.