शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार : चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:12 IST

वेगळा विदर्भ राज्याचा लढा ११५ वर्षांपासून सुरू आहे. आता प्रतीक्षा संपली आहे. सद्याचे राज्य सरकार व केंद्र सरकार वेगळा विदर्भ राज्यासाठी अनुकूल परिस्थिती असूनही विरोधात आहे.

ठळक मुद्देगडचांदुरात सभा : स्वतंत्र्य विदर्भ राज्य मुस्लीम संघर्ष समितीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : वेगळा विदर्भ राज्याचा लढा ११५ वर्षांपासून सुरू आहे. आता प्रतीक्षा संपली आहे. सद्याचे राज्य सरकार व केंद्र सरकार वेगळा विदर्भ राज्यासाठी अनुकूल परिस्थिती असूनही विरोधात आहे. त्यामुळे १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा विरोध करत नागपूर विधान भवनावर विदर्भ राज्याचा झेंडा फडकवला जाईल. त्यासाठी सर्व जाती-धर्म, पक्ष, पंथ विसरून विदर्भ राज्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन विदर्भवादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.स्वतंत्र विदर्भ राज्य मुस्लीम संघर्ष समितीच्या वतीने गडचांदूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अर्थतज्ञ आ. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, महाराष्ट्र राज्य मुस्लिम आरक्षण समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. फरहत बेग, पुरातत्व विभाग केंद्राचे माजी प्रमुख डॉ. सय्यद ख्वॉजा गुलाम (रब्बानी) यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी भाजप सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.रजा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष शेख ख्वाजाभाई, नुराणी मित्र मंचचे सय्यद अली, मदिन मस्जिदचे हाजी जुबेर, मोहमदीया मस्जिदचे शेख सादीक यांनी सभेचे आयोजन केले होते. मंचावर माजी उपसभापती रऊफ खान, माजी उपसरपंच शेख सरवर , माजी सरपंच शेख रउफ, हसन रमेश नळे, मदन पाटील सातपुते, माजी जि. प. सभापती निळकंठ कोरांगे, अरुण निमजे, रफीक निझामी, प्रवीण गुंडावार, मुमताज अली, संतोष पटकोटवार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी विदर्भ राज्याचा लढा आता तीव्र केल्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन रफीक शेख यांनी केले. प्रास्ताविक नासीर खान यांनी केले तर आभार रफीक निझामी यांनी मानले. यावेळी सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.