चंद्रपूर : वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीकरीता जनमंच व चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसच्या वतीने ‘ रेल देखो - बस देखो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांना जय विदर्भचा धाबा बांधून विदर्भ बंधनात बांधले.हे आंदोलन आज शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आले.चंद्रपूर शहरात स्थानीय गांधी चौक येथे नगरसेवक प्रशांत दानव, अनिता कथडे, कामगार नेते अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, सुधाकरसिंह गौर, अरुण बुडकर, जटपुरा गेट येथे नगरसेवक महेन्द्र जयस्वाल, उषा धांडे, सकीन अंसारी, देवेंद्र बेले, मुख्य बस स्थानक येथे कामगार नेते चंद्रशेख पोडे, सुनिता अग्रवाल, बी.के. मून, झीबल नागपुरे तसेच हेमंंत करकरे चौक बाबुपेठ येथे नगरसेवक राजेश रेवेल्लीवार, श्रीनिवास पारनंदी, बाबुलाल करुणाकर यांच्या नेतृत्वा करण्यात आले. बल्लारपूर येथे राहुल पुगलिया, कामगार नेते तारासिंग कल्सी, नगरसेवक नासीर खान, देवेंद्र आर्य, घनश्याम मुलचंदानी, अॅड. हरीश गेडाम, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, पंचायत समिती सदस्य अनकेश्वर मेश्राम, दिलीप माकोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. राजुरा येथे कामगार नेते साईनाथ बुचे, शिवचंद काळे, अजय मानवटकर, विजय ठाकरे, अरुण धोटे तसेच पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, मूल व गोडपिंंपरी अशा एकूण १२ ठिकाणी मजदूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना जय विदर्भ नावाची टोपी घालून व विदर्भ बंधनाचा धागा बांधून वेगळ्या विदर्भाची आपली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी लावून धरली. यावेळी लोकांनीसुद्धा वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ चे नारे दिले. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ४० हजार लोकांना जय विदर्भ बंधनाचा धागा बांधण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
वेगळ्या विदर्भासाठी बांधले विदर्भ बंधन
By admin | Updated: August 9, 2014 23:36 IST