शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाचे दु:ख संपता संपेना !

By admin | Updated: June 25, 2014 23:39 IST

बळीराजाला मागील काही दिवसांपासून निसर्गाचे ग्रहण लागले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका, प्रत्येक वेळी त्याचे भरून न येणारे नुकसान होत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने खरीप हंगाम

पावसाची दडी: खरीप हंगाम पुन्हा धोक्यातचंद्रपूर: बळीराजाला मागील काही दिवसांपासून निसर्गाचे ग्रहण लागले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका, प्रत्येक वेळी त्याचे भरून न येणारे नुकसान होत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून हिरावला. यंदा मृग लोटूृन पंधरावाडा उलटल्यानंतरही पावसाची चिन्ह नाहीत. आणखी काही दिवस पाऊस नसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे खरीप हंगाम पुन्हा धोक्यात आला आहे.मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने आपले उग्र रुप दाखविणे सुरू केले. गरज नसताना पाऊस मुसळधार स्वरुपात अविरत पडतच राहिला. जुलै, आगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला होता. जिल्ह्यात तब्बल चारवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही जिल्ह्याचा दौरा करावा लागला होता. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, २ लाख १६ हजार ४५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. अनेक शेतजमीन खरडून गेली होती. अनेक ठिकाणी शेतीमध्येतलावासारखे पाणी साचून होते. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना शेती करणे अशक्य झाले होते. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. अतिवृष्टीची नोंद शासनदरबारीही घेण्यात आली. मात्र शासनाची मदत शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकली नाही. त्यानंतर रबी हंगामातही पावसाने दगा केला. ऐन पिक कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकरी रबी हंगामातही फेडू शकला नाही.मागील वर्षीच्या दोन्ही हंगामात झालेले नुकसान यंदा तरी भरून निघेल, या आशेपोटी शेतकरी मोठ्या उत्साहाने खरीपासाठी तयार झाला आहे. मशागतीची कामे आटोपली. सर्वात कठीण असलेली पैशाची जुळवाजुळवही केली. बियाणे, खतांची खरेदी केली. मृगाचा पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. पंधरवाडा उलटला. तरीही पावसाचे चिन्ह नाही. अलनिनोच्या प्रभावामुळे आणखी काही दिवस पाऊस पडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)