शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे चंद्रपुरात शिक्षिकेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:50 IST

मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या खड्ड्यांमुळे एका शिक्षिकेला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेसमोरच घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या खड्ड्यांमुळे एका शिक्षिकेला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेसमोरच घडली.नंदा प्रमोद बेहरम (५८) रा. वडगाव असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या भवानजीभाई हायस्कूलमध्ये कार्यरत होत्या. सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर त्या स्कुटीने घरी जात होत्या. दरम्यान वाहतूक शाखेसमोरील रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला मागून धडक बसली. ही घटना लक्षात येताच वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचाºयांनी जखमी शिक्षिकेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मूल व रामनगर चौकातून जाणाºया वरोरा मार्गाची पावसाळ््यापूर्वी डागडूजी करण्यात आली. मात्र मुसळधार पावसाने खड्डे जैसे-थे झाले आहेत.ट्रक-दुचाकीची धडक, १७ वर्षीय विद्यार्थी ठारवरोरा : महाविद्यालयातून घरी जाताना ट्रकला दुचाकीची मागून धडक बसल्याने १७ वर्षीय विद्यार्थी ठार झाल्याची घटना वरोरा शहरातील घाटे चौकात सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. जोगेंद्र पांडुरंग फुलझेले (१७) रा. पद्मालयनगर वरोरा असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.टिप्पर-कारच्या धडकेत एक गंभीर जखमीगेवरा : बोरमाळा नदीघाटावरुन नागपूरला रेती वाहतूक करणाºया टिप्परची समोरून येणाºया कारला धडक बसली. यात कारचालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी गेवरा बुज बसस्थानक परिसरात घडली. राजेंद्र दादाजी मेश्राम (२६) रा. आकापूर असे जखमीचे नाव आहे. बोरमाळा रेतीघाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असून याकडे मात्र महसूल व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या घटनेनंतर एमएच ४०-६५३१ क्रमांकाच्या टिप्परचा चालक श्रीकांत धोंडबा मारभत्ते रा. मदनापूर ता. कुही याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहेत.