शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस नगर परिषदेच्या मागणीसाठी वीरुगिरी

By admin | Updated: August 23, 2014 23:54 IST

येथील ग्राम पंचायतला नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी करीत इबादुल हसन सिद्दीकी यांनी शनिवारी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. दरम्यान तहसीलदार गणेश शिंदे

घुग्घुस : येथील ग्राम पंचायतला नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी करीत इबादुल हसन सिद्दीकी यांनी शनिवारी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. दरम्यान तहसीलदार गणेश शिंदे यांनी भेट दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करून मागण्यावर चर्चा करुन शासन दरबारी ठेवण्याचे आश्वासन दिले. तब्बल सहा तासानंतर ते खाली उतरले. घुग्घुस ग्रामपंचायत क्षेत्राची लोकसंख्या ४० हजारांवर आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे भौगोलिक आणि औद्योगिक क्षेत्र आहे. मागील १५ पूर्वीची मागणी असताना पक्षपाती धोरण राबविले. जिल्ह्यात नगर पंचायती, नगरपालिका दिल्या. मात्र घुग्घुसला नगर पालिका देण्याचे टाळले. त्यामुळे शासन आणि प्रतिनिधींबद्दल गाववासीयांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.दरम्यान घुग्घुसला नगरपालिका व्हावी यासाठी घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीचे गठण करण्यात आली. समितीने रास्ता रोको आंदोलन, आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान शनिवारी संघर्ष समितीचे सचिव इबादुल हसन सिद्दीकी सकाळी ११ वाजता अचानक नायब तहसीलदार कार्यालयाच्या मागील असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले. विरुगिरीची बातमी गावात पसरताच मोठ्या संख्येने टॉवरकडे नागरिकांनी धाव घेतली.गावात पाणी पुररवठा योजनाचे भुमिपूजन समारंभ असताना अचानक झालेल्या विरुगिरीने चांगलाच झटका बसला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार गणेश शिंदे यांनी घुग्घुस गाठून इबादुल सिद्दीकी यांच्याशी संपर्क साधला. मात्र आपल्या मागण्याबाबत शासनाने विचार केल्याशिवाय खाली येणार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान प्रतिनिधीशी तहसीलदार शिंदे यानी चर्चा केली आणि मागण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. तब्बल सहा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)