शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

कारभारणीच्या सरपंचपदासाठी ‘वाट्टेल ते’

By admin | Updated: August 22, 2015 01:27 IST

जिल्ह्यात झालेल्या ६२८ ग्रामपंचाययतीचे निकाल ६ आॅगस्टला लागले. त्यानंतर आता सरपंच पदाचे वेध संभावित उमेदवारांना लागले आहेत.

बहुमतासाठी पतीकडून पैशाचा पाऊस : देवदर्शनासह पर्यटनवारीची तयारीराजकुमार चुनारकर खडसंगीजिल्ह्यात झालेल्या ६२८ ग्रामपंचाययतीचे निकाल ६ आॅगस्टला लागले. त्यानंतर आता सरपंच पदाचे वेध संभावित उमेदवारांना लागले आहेत. सरपंच पद महिला राखीव असलेल्या गावातील नेत्यांनी निवडणुकी आधीच या पदासाठी ‘फिल्डींग’ लावली होती. आता विजयी झालेल्या आपल्या कारभारणीलाच गावचे सरपंच करण्याचा चंग पतीराजाने बांधला आहे. पद घरातच ठेवण्यासाठी ‘वाट्टेल ते’ करण्याची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र सध्या चिमूर तालुक्यात दिसत आहे.मागील महिन्यात आकाशातून पाऊस बरसणे कमी होते. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. आता काही प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी बळीराजाची चिंता थांबली नाही. मात्र ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांवर कारभारणीच सरपंच व्हावी, यासाठी पैशाचा पाऊस पडू लागल्याचे चित्र काही गावात दिसू लागले आहे. काही झाले तरी आपली पत्नी सरपंच होणे गरजेचे असल्याचे गाव पुढारी बोलत आहेत. ती सरपंच झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पण करीत अनेक पतीराजाची ‘वाट्टेल ते’ करण्याचे ठाणले आहे.आमदारकीच्या निवडणुकीत स्पर्धा कमी पहायला मिळते. पण सध्यातरी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ही स्पर्धा तीव्र असल्याचे पहायला मिळत आहे. काही गावात आपण आमदार साहेबांच्या किती जवळचे आहोत. त्यांचा निधी आपल्या गावाला कसा येईल, अशी आश्वासने देण्यास सध्या गाव पुढारी गुंतल्याचे त्यांच्या हालचालीवरुन दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता गावोगावी विजयी पार्टीच्या माध्यमातून सदस्यांना जुळवणे सुरू झाले आहे. प्रत्येकालाच सरपंच निवडीचे वेध लागले आहेत.सरपंचपद आपल्या घरातच आले पाहिजे. या भूमिकेवर ठाम मत असल्याने ‘वाट्टेल ते’ करुन पद पदरात पाडून घेण्यासाठी गाव पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे. आणि होणाऱ्या खर्च पाहून घेऊ, हा मंत्र घेऊन कुणी देवदर्शन तर काही पर्यटनाचे आमिष दाखविण्यात गुंतले आहेत.सरपंच पदासाठी लागणारा ‘जादुई आकडा’ गाठण्यासाठी कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्ह्यातील आमदार मंडळी आपल्या पक्षाच्या किती ग्रामपंचायतीचे सरपंच येणार, यासाठी सरसावले आहेत. सरपंचपद आपल्या पक्षाचे असावे, यासाठीही मात्तबर नेते कामाला लागले आहे.