१० जणांना लाभ : १० हजारांचे अर्थसहाय्यब्रह्मपुरी : आमदार विजय वडेट्टीवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शनिवारी एका साध्या समारंभारत अर्थसहाय्य केले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील १० शेतकऱ्यांनी यावर्षी आत्महत्या केल्या. या घटनांची दखल घेत आमदार वडेट्टीवार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या नातेवाईकांना ब्रह्मपुरीत पाचारण केले. एका साध्या समारंभात प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १० हजाराची आर्थिक मदत म्हणून धनादेश वितरित करण्यात आले. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सुधाकर बावणे रा. रामाळा ता. सिंदेवाही, मधुकर चहांदे रा. लाडबोरी (सिंदेवाही), केवळराम मेश्राम (गांगलवाडी), गुलाबराव मोहूर्ले (कोसंबी), गुणाजी खेवले (एकारा), सिताराम ढोरे (परसोडी), रघुनाथ वलतोंडे रा. निलज, प्रमोद लोणारे रा. गोगाव, लक्ष्मण बोरकर रा. कळमगाव, दिलीप कांबळी रा. कळमगाव (गन्ना) यांचा समावेश होता. त्यांच्या कुटुंबीयांनी ही मदत देण्यात आली. यावेळी प्रभाकर सेलोकर, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष मनोहर पाऊणकर, अशोक रामटेके, नेताजी मेश्राम, विलास विखार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना वडेट्टीवारांची मदत
By admin | Updated: December 13, 2015 00:43 IST