शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण चाचणीविनाच धावतात वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:12 IST

चंद्रपूर : वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर अंतर चाललेल्या वाहनाची प्रदूषण नियंत्रण चाचणी करण्याचा वाहतूक ...

चंद्रपूर : वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर अंतर चाललेल्या वाहनाची प्रदूषण नियंत्रण चाचणी करण्याचा वाहतूक विभागाचा नियम आहे. मात्र अनेक वाहनचालक याकडे कानाडोळा करीत आहेत. जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी यासह अवजड वाहने अशी एकूण चार लाख ५३ हजार १९२ वाहने रस्त्यावर धावत आहेत. या वाहनांद्वारे निघणाऱ्या धुराची तपासणी करण्यासाठी डिझेल व पेट्रोलचे मिळून केवळ ५३ पीयूसी केंद्र आहेत.

चंद्रपूर जिल्हा प्रदूषणासाठी कुप्रसिद्ध आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषणात आणखी भर पडत आहे. प्रदूषण नियंत्रण तपासणीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे प्रदूषण नियंत्रण तपासणीसाठी जिल्ह्यात पेट्रोलचे २६ व डिझेलचे २७ पीयूसी केंद्र कार्यरत आहेत. दहा हजार किमी वाहन चालल्यानंतर त्याची पीयूसी करणे अनिवार्य असताना अनेक वाहनचालक याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. तर अनेक वाहनचालक पेट्रोलऐवजी रॉकेलचाही वापर करतात. परिणामी प्रदूषणात वाढ होत आहे. अशा वाहनचालकांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे.

बॉक्स

प्रदूषित वाहने तपासणीचे दर

मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार वायुप्रदूषण तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार पीयूसी केंद्राकडे आहेत. त्याचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. दुचाकीसाठी ३५ रुपये, तीनचाकीसाठी ७० रुपये, चारचाकी ९०, डिझेलवरील वाहने शंभर रुपये आकारणी करण्याचे अधिकार आहेत. मात्र अनेक पीयूसीचालक अतिरिक्त दर आकारत असल्याची ओरड वाहनचालकांकडून होत आहे.

कोट

पीयूसी नसणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. वाहनचालकांना ज्यावेळी वाहतूक कार्यालयात काम असते. त्यावेळेस त्यांचा पीयूसी काढण्याकडे ओघ असतो. त्यामुळे रस्ते सुरक्षा अभियानातंर्गत विशेष पीयूसी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यासोबतच पीयूसी केंद्रचालकांच्या मदतीने मोफत पीयूसी शिबिर राबविण्याचा मानस आहे.

किरण मोरे,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

बॉक्स

रस्त्यावर धावणारी वाहने

मोटारसायकल १,४८,५८८

स्कूटर, मोपेड १,९०,२६३

मोटार कार ३९,९००

जीप ८,३६८

कॅब १,४४९

ऑटोरिक्षा ८,९१०

बस १,३४०

रुग्णवाहिका ४३९

एचजीव्ही १३,४२३

एलजीव्ही १४,०३०

ट्रॅक्टर १६,६७१

ट्रेलर ८,२०८

इतर १,६०८