शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनमालकानेच लावला चोरीच्या वाहनाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:35 IST

शहरात गेल्या पंधरवड्यात तीन मोटरसायकली, १० मोबाईल चोरी व दोन घरफोडीच्या घटना घडल्या.

चोरटे मोकाटच : ब्रह्मपुरी शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळब्रह्मपुरी : शहरात गेल्या पंधरवड्यात तीन मोटरसायकली, १० मोबाईल चोरी व दोन घरफोडीच्या घटना घडल्या. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही. चोरटे चोरीच्या वाहनांचे नंबरप्लेट बदलवून फिरत असताना गाडीमालकाला दिसले. त्यामुळे त्यांचा पाठलाग करून गाडी परत मिळविण्यात यश आले असले तरी अद्यापही चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाही.प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांची दुचाकी भर दुपारी घराजवळून चोरीला गेली. त्यानंतर दर्वे व पुन्हा एकाचे दुचाकी वाहन अशी तीन वाहने दोन दिवसात चोरीला गेली. शुक्रवारच्या बाजारात नामदेव बगमारे, विजय कुंभारे यांच्यासह १० नागरिकांचे महागडे मोबाईल चोरीला गेले. याच काळात तंत्रनिकेतन वसाहतीत तीन घरफोड्या व तहसील कार्यालयासमोरील सहारे यांच्या घरी चोरी झाली. एकही चोर पोलिसांना गवसलेला नाही. त्यामुळे चोरट्यांची भिती निर्माण झाली. चोरट्यांनी शक्कल लढवित वाहनाचे नंबर प्लेट बदलून शहरात फिरायला सुरूवात केली. प्रा.मेश्राम हे नेहमीप्रमाणे कटाक्षाने वाहनांवर लक्ष ठेवून असताना त्यांच्या महा-३४- ०५२० क्रमांकाची नंबरप्लेट दर्वे यांच्या यांच्या दुचाकी वाहनाला लावलेली दिसली. त्यांनी पुन्हा शोध घेतला असता, ख्रिस्तानंद स्कूलजवळ बेवारस अवस्थेत विना नंबरची हिरोहोंडा फॅशन दुचाकी उभी दिसली. त्यांनी आपले वाहन ताब्यात घेतले. दर्वे यांनाही त्यांचे वाहन सापडले. या सर्व घटनेवरुन दुचाकी वाहन मालकच पोलिसांची भूमिका बजावत होते. परंतु, चोरांची टोळी मात्र हाती लागू शकली नाही. या सर्व प्रकरणाचा छडा लावून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)