शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत तिघे जागीच ठार

By admin | Updated: April 5, 2017 00:38 IST

आदिलाबादकडून येणाऱ्या वाहनाला कट मारुन जाण्याच्या नादात दुचाकीस्वार तिघांचा जागीच मृत्यू झाला.

कोरपना-आदिलाबाद मार्गावरील घटना : कट मारण्याच्या नादात दुचाकीला अपघातकोरपना : आदिलाबादकडून येणाऱ्या वाहनाला कट मारुन जाण्याच्या नादात दुचाकीस्वार तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कोरपना-आदिलाबाद महामार्गावरील मेहंदी नाला पुलाजवळ घडली.सुनील कोंडूजी सहारे (२६) रा. तुकडोजीनगर कोरपना, आशिष गणेश भोयर (२२) रा. हिंगणघाट जि. वर्धा, माधवराव लक्ष्मण राऊत (३०) रा. सावंगी जि. यवतमाळ असे मृतांची नावे आहेत. मृतक हे एमएच- ३४ एक्स- ९४५० क्रमांकाच्या दुचाकीने तेलंगणा राज्यातील बेलाकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र कट मारण्याच्या नादात अपघात घडला आणि तिघेही दुचाकीवरुन फेकल्या गेले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कोरपना ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले. घटनेचा तपास सुरू आहे. (वार्ताहर) लग्नकार्यावरून येताना अपघात; एक ठारब्रह्मपुरी : किन्ही गावातून लग्नकार्य आटोपून येत असताना वेटाळा फाट्याजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने ईश्वर बाबुराव डोईजड (४६) रा. ब्रह्मपुरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मृत ईश्वर डोईजड हे किन्ही येथे लग्नकार्यासाठी मंगळवारी सकाळी स्वत:च्या दुचाकीने गेले होते. लग्नकार्य आटोपून परत ब्रह्मपुरीला येत असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अज्ञात वाहन धारकाविरूद्ध कलम २७९, ३०४, ८ (३९) भादंवि सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)