शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपांवर वाहनांची झुंबड

By admin | Updated: August 25, 2014 23:53 IST

स्थानिक संस्था कर व मुंबईच्या आॅक्ट्रायविरोधात पेट्रोलपंप असोसिएशनने आंदोलन छेडले. या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने मंगळवारपासून पेट्रोल पंप बेमुदत बंदचा इशारा दिला.

चंद्रपूर : स्थानिक संस्था कर व मुंबईच्या आॅक्ट्रायविरोधात पेट्रोलपंप असोसिएशनने आंदोलन छेडले. या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने मंगळवारपासून पेट्रोल पंप बेमुदत बंदचा इशारा दिला. त्यामुळे आज सोमवारी चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पेट्रोलपंपावर वाहनांची झुंबड उडाली होती. सकाळी ११ पासून रात्री उशिरापर्यंत पंपांवर वाहनांची गर्दी कायम होती. सध्या पेट्रोल, डिझेल या एकप्रकारे जीवनावश्यक वस्तूच झाल्या आहेत. मात्र शासनाने पेट्रोलवर महापालिका हद्दील एलबीटी लावून चैनीच्या वस्तूंप्रमाणे कर आकारला आहे. ही बाब अन्यायकारक आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिकेत आॅक्ट्राय लागू आहे. या आॅक्ट्रायचा फटका राज्यातील इतर जिल्ह्यांना बसत आहे. परिणामी पेट्रोल असोसिएशनने याचा कडाडून विरोध केला आहे. मुंबईचा आक्ट्राय आम्ही का भरावा व पेट्रोलवर चैनीच्या वस्तूंसारखा एलबीटी लावू नये, या मागणीसाठी पेट्रोलपंप असोसिएशनने ११ आॅगस्ट रोजी पेट्रोलपंप बंद ठेवत आंदोलन छेडले होते. त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यामुळे उद्या मंगळवारपासून पेट्रोल पंप बेमुदत बंद राहील, असा निर्णय पेट्रोल असोसिएशनने घेतला. जिल्ह्यात एकूण ९९ पेट्रोलपंप आहेत. यात इंडियन आॅईलचे ३७, भारत पेट्रोलियमचे ३५ व हिंदुस्थान पेट्रोलियमचे २७ पंप आहेत. यातून दररोज चार कोटींची उलाढाल होते. उद्यापासून बंद राहणार या भीतीने सोमवारी जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपवर वाहनांची झुंबड उडाली होती. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पंपावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे दररोज होणारी चार कोटींची उलाढाल आज आठ कोटीपर्यंत गेल्याची माहिती आहे. काही नागरिकांनी ५ ते १० लिटरपर्यंत पेट्रोलचा साठा केला. (शहर प्रतिनिधी)