शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात भाजीपाला मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्यात मागील चार वर्षांपासून भाजपा सरकार सत्तारूढ आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालावर योग्य भाव न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारचा निषेध ...

ठळक मुद्देकाँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन : सरकार विरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्यात मागील चार वर्षांपासून भाजपा सरकार सत्तारूढ आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालावर योग्य भाव न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या न्याय मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारचा निषेध करण्याच्या अनुषंगाने बुधवारी काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी गांधी चौकात आंदोलन करीत घाम गाळून पिकविलेला भाजीपाला मोफत वाटून दिला.यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले. यावेळी नरेश पुगलिया म्हणाले, सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाला उचित भाव देण्याचे आश्वासन दिले. मात्र सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला. यामुळेच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून ऐन खरिपाच्या हंगामात आंदोलन करावे लागत आहे. शेतकरी आजघडीला डबघाईस आला आहे. त्याच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी प्रधान देशात विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची अवस्था गलितगात्र करून ठेवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंंबा म्हणून आंदोलनात सहभाग घेतला आहे, त्याचप्रमाणे १ ते १० जूनदरम्यान सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत असल्याचे ते म्हणाले.मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना लालीपाप दाखवत उत्पादित मालाच्या लागत मुल्यापेक्षा ५० टक्के आधारमूल्य देण्याची घोषणा केली. मात्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला भाव मिळत नाही. बि-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांचा लागणारा खर्च निघत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाला. याचे पडसाद देशभर उमटले आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंंबा देण्यासाठी व त्यांच्या न्याय मागण्या त्वरित सोडविल्या जाव्या म्हणून जिल्ह्यातील शेतकºयांना भाजीपाला रस्त्यावर न टाकता गरजू लोकांना मोफत वाटला.यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळीच कर्ज वाटप झाले पाहिजे व मोफत बि- बियाण्यांचा पुरवठा करावा, अशी घोषणाबाजी करून सरकारकडे न्याय मागितला. या आंदोलनात विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस, चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस, एनएसयुआय, युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस तसेच कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्यासह कॉंग्रेसचे राहुल पुगलिया, चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गटनेते तथा विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकूलकर, नगरसेवक अशोक नागापुरे आदी उपस्थित होते.अनेक गावातील शेतकरी सहभागीसदर आंदोलन शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या मागणीसाठी असल्याने मार्डा, विसापूर, शिवणी, पिपरी, दाताळा, वेंडली यासह चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. केवळ सहभागच दर्शविला नाही तर त्यांनी बैलबंडीतून आपल्या शेतातील भाजीपालाही वाटण्यासाठी आणला.