शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीर बाबुराव शेडमाकेंचा संघर्ष समाजासाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST

कोरपना : वीर बाबुराव शेडमाके यांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरूद्ध अठराव्या शतकात कठोर संघर्ष केला. त्यांचा संघर्ष समाजासाठी ...

कोरपना : वीर बाबुराव शेडमाके यांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरूद्ध अठराव्या शतकात कठोर संघर्ष केला. त्यांचा संघर्ष समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील सावलहिरा येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण, सार्वजनिक वाचनालय आणि डिजिटल क्लासरुमचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी ते म्हणाले की, वीर बाबुराव शेडमाके आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तीसाठी केलेला संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रेरणेने युवा पिढीने आपले आयुष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर गोडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी कोवे, जिल्हा परिषद सदस्या कल्पना पेचे, विनाताई मालेकार, उपसभापती सिंधुताई आस्वले, माजी सभापती शाम रणदिवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उत्तम पेचे, सरपंच वनमाला कोवे, सुरेश मालेकर, रोशन आस्वले, गणेश गोडे, दिनकर मुसळे, दामोदर मालेकर, भारत तोडासे, मेहबान राठोड, मुख्याध्यापक कैलास मस्की, सोमलाल कोहचाडे, तुळशीराम टेकाम, मोतीराम यांच्यासह गावकरी उपस्थित होते.