शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि महिला कर्मचाऱ्याचा खून

By admin | Updated: November 13, 2016 00:36 IST

येथील खुली कोळसा खाण क्र. ३ च्या रेल्वे काटा घराजवळ कामावरून जेवनाच्या सुटीत घराकडे परत जात असताना ...

श्वान पथकाला पाचारण : हत्येचे कारण अज्ञातमाजरी : येथील खुली कोळसा खाण क्र. ३ च्या रेल्वे काटा घराजवळ कामावरून जेवनाच्या सुटीत घराकडे परत जात असताना शनिवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास वेकोलिच्या एका महिला कर्मचाऱ्याची वजनी शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे. मृत महिलेचे नाव बातुनी अमीर अली (६०) आहे. ही महिला माजरीच्या सिद्धार्थ वॉर्ड क्र. ४ मधील रहिवासी आहे.बातुनी अमीर अली शेख ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांची केवळ १८ दिवसांची सेवा शिल्लक होती. वृत्तलिहोस्तोवर त्यांची हत्या करणारे आरोपी पकडले गेले नव्हते. सदर महिलेच्या डोक्यावर वजनदार शस्त्राने तीन-चार वार करण्यात आले. त्यामुळे मेंदु बाहेर येऊन त्यांचा मृत्यू झाला.माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार के. तिवारी यांनी आरोपीला पकडण्याकरिता चंद्रपूर येथून श्वान पथक बोलाविले होते. हा श्वान घटनास्थळापासून महिलेच्या घरापर्यंत पोहचला. परंतु तो आरोपी शोधू शकला नाही.घटनेची माहिती मिळताच वरोराचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रताप पवार यांनी भेट दिली. या महिलेला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे घराचे काम सुरू असल्याने तो तेथे गेला आहे. माजरी पोलिसांनी तिच्या मुलीचे पती अस्लम यांचा मोबाईल तात्पुरता जमा केला आहे. बातुनी अमीर अली शेख यांच्या हत्येसंदर्भात पोलीस उपविभागीय अधिकारी प्रताप पवार व ठाणेदार के. तिवारी यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. (वार्ताहर)