एस.के. वैश्यकीयार : वेकोलिच्या विकासात कामगाराचे योगदान मोलाचेराजुरा : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या सर्वांगीण विकासात कामगारांची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच विकासाच्या गाथेमध्ये वेकोलिच्या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक एस.के. वैश्यकीयार यांनी केले.राजुरा येथे वेकोलिच्या सतर्कता जागरुकता आठवड्याच्या समारोपिय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा येथील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना करिता विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच शहरातून सतर्कता जागृती रॅली काढून नागरिक व कामगारांत जनजागृती करण्यात आली. यावेळी शहरातील बहुसंख्य नागरिक व विद्यार्थ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
वेकोलिच्या सतर्कता जागरुकता सप्ताहाचा समारोप
By admin | Updated: November 4, 2015 00:51 IST