घुग्घुस : वेकोलिच्या वणी क्षेत्राच्या वतीने स्थानिक राजीव रतन दवाखान्यासमोरून कामगार, आॅफिसर कॉलनी ते सामूदायिक मनोरंजन केंद्रापर्यत मुख्य महाव्यवस्थापक मुजुमदार यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचार विरोधी जनजागृती रॅली काढून भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश देण्यात आला.रॅलीत वणी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पाचही उपक्षेत्राचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक, उपक्षेत्रातील ट्रेड युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते , एससीएसटी, सिस्टाचे पदाधिकारी, त्रिपक्षीय सुरक्षा समिती, जेसीसी, क्षेत्रीय कल्याण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मुख्य महाव्यवस्थापक मुजुमदार यांनी भ्रष्टाचार हा रोग मधुमेहासारखा असल्याचे सांगून रोग नाहीसा होणार नसला तरी कंट्रोल करता येते म्हणून सर्वानी अंत:करणातून शपथ घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यापुढे आपल्या क्षेत्रात भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, अशा इशाराही वणी क्षेत्राचे नवे मुख्य महाव्यवस्थापक मुजूमदार यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालक व आभार प्रदर्शन कार्मिक प्रबंधक देव यांनी केले. (वार्ताहर)
वेकोलिची भ्रष्टाचाराविरोधी रॅली
By admin | Updated: November 6, 2016 00:57 IST