शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा शहर काँग्रेस कमेटीचे उपोषण सुरूच

By admin | Updated: May 15, 2016 00:36 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज जोडणीचा प्रश्न, बेरोजगारांना बँकांमार्फत न मिळणारे कर्ज, अनेक दिवसांपासून अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देण्याचे आश्वासन देऊन...

वरोरा : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज जोडणीचा प्रश्न, बेरोजगारांना बँकांमार्फत न मिळणारे कर्ज, अनेक दिवसांपासून अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देण्याचे आश्वासन देऊन न मिळालेले पट्टे आदी मागण्यांसाठी वरोरा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष शेख जैरूद्दिन यांच्या नेतृत्वात गुरूवारपासून तहसील कार्यालयसमोर साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन उपोषणकर्त्याशी चर्चा केली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बँक व सहकारी सोसायट्यांमधून कर्ज घेतले व शेतात ट्युबवेल मारले. महावितरण कंपनीकडे डिमांड भरून विद्युत कनेक्शन मिळण्याकरिता अर्ज सादर केले. मात्र शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही वीज कनेक्शन मिळालेले नाही. अनेक शेतकऱ्यांचे अर्ज कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची विनाकारण व्याज भरावे लागत असल्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पन्न वाढवून आर्थिक विकासाच्या अपेक्षा केल्या होत्या, त्यांच्यावर चुकीच्या धोरणामुळे उपासमारी व आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे विद्युत जोडणी करून द्यावी, अशी मागणी साखळी उपोषणातून करण्यात येत आहे. सन राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत तालुक्यासह मंजूर झालेल्या कामात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. उपोषणाला माजी नगराध्यक्ष विलास टिपले, डॉ. विजय देवतळे, लक्ष्मणराव गमे, पं. स. सभापती सुनंदाताई जीवतोडे, वसंतराव विधाते, अनिल वरखडे यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला. मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू, असे छोटू भाई शेख यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणारआ. विजय वडेट्टीवार यांनी उपोषकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नव्या जिल्हाधिकाऱ्यांशी या विषयावर बैठक घेऊन चर्चा करणार आहे. चर्चेनंतरही मागण्या निकाली न निघाल्यास आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, सभापती सुनंदा जिवतोडे, गिरीधर काळी, वसंतराव विधाते, कादर शेख, सचिन मेश्राम, गणराज भिवदरे उपस्थित होते.