शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा आरोग्य केंद्रात विविध समस्या

By admin | Updated: August 27, 2015 01:19 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे रुग्णांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

रुग्णांची गैरसोय : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्तदेवाडा: राजुरा तालुक्यातील देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे रुग्णांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनगृह आहे. या शवविच्छेदनगृहाच्या इमारतीचे बांधकाम आठ ते दहा वर्षांपूर्वी झाले. परंतु शवविच्छेदनगृहात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. देवाडा व परिसरात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. हे गाव पेसाअंतर्गत येते. परंतु देवाडा व परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिसरात कोणत्याही कारणाने एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी येथून २० ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुरा येथे जावे लागते. परंतु दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांना मृतदेहाची ने-आण करण्यासाठी वाहनाची गरज असते. त्यामुळे अनेकदा त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. उसनवारीने पैसे घेऊन त्यांना गरज भागवावी लागते. देवाडा येथे शवविच्छेदनगृह असूनही तेथे कर्मचाऱ्याची नियुक्त करण्यात न आल्याने नागरिकांना शासकीय अव्यवस्थेचा फटका सहन करावा लागतो. या परिसरातील नागरिकांच्या सोईसाठी शवविच्छेदनगृहाला मंजुरी मिळाल्यानंतर या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र तेथे कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची तसदी घेण्यात आली नाही. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडूनही यासाठी कोणताच पाठपुरावा करण्यात येत नसल्याने समस्या गंभीर बनली आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही इमारत शोभेची वास्तू ठरत आहे. देवाडा परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून अकाराण भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचेदेखील दुर्लक्ष होत आहे. लाखो रुपये खर्चून उभी करण्यात आलेली इमारत निरूपयोगी ठरत असल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. शवविच्छेदनगृहात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)रुग्णसेवेचा भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर राजुरा तालुक्यातील देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे आहेत. मात्र येथे कार्यरत एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. रिक्त झालेल्या जागेवर अद्याप वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखविली नसल्याने आठ महिन्यांपासून केंद्रांतर्गतची रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. वातावरण बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गाव पातळीवर वेळीच उपचार मिळत नसल्याने नाईलाजाने अनेक रुग्णांना खासगी डॉक्टरांकडून उपचार करवून आर्थिक भार पेलावा लागत आहे. देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ६५ गावे समाविष्ठ असून भुरकुंडा, सोन्डो लक्कडकोट वरुर टेंभुरवाही मानोली पाचगाव सोनापूर पांढरपौनी या १० उपकेंद्रातील रुग्णांचा भार सांभाळण्यासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती अत्यावश्यक आहे. वरिष्ठांच्या दुर्लक्षितपणामुळे एक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. त्यामुळे देवाडासह परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यातसन २०१४ पासून हत्तीरोग विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या विभागातील दोन पद रिक्त आहे. २०१४ पासून आरोग्य कर्मचारी वाय. डी. तुम्बडे व आणखी एकाची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त आहेत. परंतु आजपर्यंत रिक्त जागेवर नवीन नियुक्ती झाली नाही. त्यामुळे डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. नाली, गटार,े सांडपाणी खड्डे भरल्यामुळे डासांची उत्पती होत असून फवारणीही केली जात नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.