शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विविध कार्यकारी संस्थेची तिजोरी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:50 IST

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेल्या सावली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची तिजोरी फोडून ५० हजार रुपयाची रोकड व चांदीचे पाच शिक्के असा एकूण ५३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविला. या धाडसी चोरीने दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देधाडसी चोरी : ५० हजार रूपये व चांदीचे शिक्के पळविले

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेल्या सावली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची तिजोरी फोडून ५० हजार रुपयाची रोकड व चांदीचे पाच शिक्के असा एकूण ५३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविला. या धाडसी चोरीने दहशत निर्माण झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.आठवडाभरापूर्वी लगतच असलेल्या शेतकरी राईस मीलच्या गोदामाचे कुलूप कटरने कापून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तेथे धानाच्या व्यतीरिक्त काहीही हाती लागले नाही. आठ दिवसानंतर शनिवारी त्याच्याच शेजारी असलेल्या विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यालयाचे शटर तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला. येथील तिजोरी फोडून त्यातील ५३ हजाराचा ऐवज रोख रकमेसह पळवून नेला.सदर संस्था सावली तालुक्यातील नामवंत असून गत ७५ वर्षांपासून संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत शेतकºयांना पीक कर्ज, रासायनीक खते आणि रेशनचे धान्य वाटप केले जाते.या संस्थेतून कोट्यवधीची उलाढाल होत असते. मात्र घटनेच्या रात्री तिजोरीत केवळ ५० हजार रुपये रोख होते. अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून शेजारीच असलेल्या विहिरीत तिजोरी फेकून दिली. यासोबतच त्यांनी रेशन दुकानाचेही कुलूप फोडले. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही.या घटनेची माहिती संस्थेचे अध्यक्ष मुन्ना स्वामी यांनी सावली पोलिसांनी दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून चौकशी सुरु केली. त्याकरिता श्वान पथक व फॉरेसील विभागाला पाचारण करण्यात आले. पुढील तपास सावलीचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.वेकोलि कॉलनीत घरफोडीघुग्घुस : वेकोलिच्या राजीव कॉलनीत राहणाºया निलजई साऊथमध्ये कार्यरत अभियंता रणजितसिंह भाटी यांच्या क्वार्टरचे मागचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप, पेनड्राईव्ह असा एक लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अभियंता रणजितसिंह भाटी हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी परत आले असता, समोरील दार तुटलेल्या अवस्थेत आढळले. आत प्रवेश केला असता, लॅपटॉप आणि चार पेनड्राईव्ह असा एक लाखांचा ऐवज लंपास झाल्याचे दिसले. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून चोरट्याचा शोध घेत आहेत.