शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्याचा आदित्य मिलमिले अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:52 IST

वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्क़ूल येथील विद्यार्थी आदित्य मिलमिले याने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. यासोबत चंद्रपूर येथील माऊंट कार्मेट कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी शिवम कुमार हा ९७.८ टक्के घेऊन दुसरा आला आहे तर श्री महर्षी विद्या मंदिरातील आदित्य रोकमवार व माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलचा वेद देशकर यांनी ९७.४ टक्के गुण घेत संयुक्तपणे तृतीय स्थान पटकाविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

ठळक मुद्देदहावीचा निकाल १०० टक्के : चंद्रपुरातील शिवम कुमार द्वितीय, आदित्य रोकमवार व वेद देशकर तृतीय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्क़ूल येथील विद्यार्थी आदित्य मिलमिले याने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. यासोबत चंद्रपूर येथील माऊंट कार्मेट कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी शिवम कुमार हा ९७.८ टक्के घेऊन दुसरा आला आहे तर श्री महर्षी विद्या मंदिरातील आदित्य रोकमवार व माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलचा वेद देशकर यांनी ९७.४ टक्के गुण घेत संयुक्तपणे तृतीय स्थान पटकाविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी १०० टक्के निकाल देत आपली परंपरा कायम ठेवली आहे. चंद्रपुरातील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, श्री महर्षी विद्या मंदिर, बिजेएम कॉर्मेल अ‍ॅकेडमी, चांदा पब्लिक स्कूल, सेंट मायकल इंग्लिश स्कूल, चांदा पब्लिक, विद्या निकेतन, मॅक्रुन स्टुडंट अकाडमी, नारायणा विद्यालयम आदी शाळांमध्ये सीबीएससी दहावीचा अभ्यासक्रम आहे.या सर्व शाळांनी १०० टक्के निकाल तर दिला, सोबतच येथील बहुतांश विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण घेत प्राविण्य मिळविले.याशिवाय जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालय आयुधनिर्माणी, दिलासाग्राम हायस्कूल, बल्लारपूर, मोंटफोर्ट कॉन्व्हेंट, बामणी, विश्वज्योती कॉन्व्हेंट तळोधी (बा.), नवोदय विद्यालय, तळोधी (बा.), साई कॉन्व्हेंट भद्रावती, सेंट कॅलरेट इंग्लिश मिडीयम स्कूल, चिमूर, इन्फंट कॉन्व्हेंट, राजुरा, होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचांदूर, अंबुजा विद्या निकेतन, गडचांदूर, स्टेला मॉरीस कॉन्व्हेंट, बामणवाडा, आदित्य बिरला पब्लिक स्कूल, आवारपूर, संस्कार भारती पब्लिक स्कूल वरोरा, आदी शाळांनीही १०० टक्के निकाल देत आपली परंपरा कायम ठेवली आहे.माऊंट कार्मेलचे ४० विद्यार्थी गुणवत्ता यादीतचंद्रपुरातील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलने यंदाही १०० टक्के निकाल दिला आहे. याशिवाय यंदाच्या निकालात या शाळेतील तब्बल ४० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण घेत प्राविण्य प्राप्त केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गुणवत्ता यादीत असणारी ही जिल्ह्यात पहिलीच शाळा ठरल्याचे मानले जात आहे.स्पर्धा वाढली, दर्जाही वाढतेयसध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे आपला पाल्य स्पर्धेच्या युगात टिकावा, यासाठी पालक पाल्यांना चांगल्या व दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश देण्यास उत्सुक असतो. यामुळे शाळांमधील स्पर्धाही वाढली आहे. जिल्ह्यात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये स्पर्धा वाढली असून दर्जा टिकविण्यासाठी शाळा प्रशासन झटताना दिसत आहे.