शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांमुळे वेकोलिला दररोज ४० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:42 IST

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी येथील पोवनी-२ कोळसा खाणीचे काम प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील २४ दिवसांपासून ठप्प आहे.

ठळक मुद्देपोवनी खाण २४ दिवसांपासून बंद : वेकोलिचे कोळसा उत्पन्न थांबले

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी येथील पोवनी-२ कोळसा खाणीचे काम प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील २४ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे वेकोलिला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. मात्र, समस्या जाणून घेण्यासाठी शासन गंभीर नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला आहे.प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी विविध मागण्यांसाठी वेकोलि व शासनाच्या विरोधात १० आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे वेकोलिचे काम बंद आहे. त्यामुळे वेकोलिला दररोज ४० लाखांचे नुकसान सहन करावा लागत आहे. नुकसानीचा हा आकडा दहा कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. पोवनी २ व ३ प्रकल्पासाठी जवळपास एक हजार ९०० हेक्टर जमीन संपादित केली आहे. पवनी २ कोळसा खाणीमध्ये ११३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. पवनी ३ मधील प्रकल्पग्रस्त शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये मोबदला देण्यात यावा, प्रति सातबारा नोकरी देण्यात यावी, पोवनी २ च्या प्रकल्पांना तत्काळ मोबदला, नोकरी देण्यात यावी, साखरी गावातील बेरोजगारांना पोवनी २ खाणीमध्ये रोजगार देण्यात यावा, साखरी शेतशिवारातील उर्वरित जमीन पोवनी ३ प्रकल्पात समाविष्ट करण्यात यावी, पवनी ३ मधील प्रकल्पग्रस्तांना बल्लारपूर येथील खुल्या खाणीत नोकरी देण्यात यावी, यासह १२ मागण्यांचे निवेदन प्रकल्पग्रस्तांकडून देण्यात आले आहे.