शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अटलजींचे राष्ट्रउभारणीत अमूल्य योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:55 IST

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले. सर्वधर्मसमभाव ही वृत्ती जोपासून त्यांनी राजकारण केले. त्यामुळे अटलजींचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे कायम राहणार आहे, असा सूर श्रद्धांजली कार्यक्रमात उमटला. गुरूवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सर्वपक्षीय व विविध संघटनांनी ही श्रद्धांजली सभा घेतली होती.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले. सर्वधर्मसमभाव ही वृत्ती जोपासून त्यांनी राजकारण केले. त्यामुळे अटलजींचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे कायम राहणार आहे, असा सूर श्रद्धांजली कार्यक्रमात उमटला. गुरूवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सर्वपक्षीय व विविध संघटनांनी ही श्रद्धांजली सभा घेतली होती.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलीया, आमदार नाना शामकुळे, राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी, महापौर अंजली घोटेकर, शिवसेनेचे किशोर जोरगेवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, रिपाइं (आ.) अशोक घोटेकर, रिपाई नेते व्ही. डी. मेश्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रिपाइं (आ.)चे जिल्हाध्यक्ष अशोक घोटेकर, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, चंदनसिंह चंदेल, महापौर घोटेकर, गयाचरण त्रिवेदी, देवपुजारी, डॉ. एम. जे. खान यांनी अटलजींच्या राष्ट्र निमार्णातील योगदानाचे स्मरण करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी अटलजींच्या अस्थिकलशाचे उपस्थितांनी दर्शन घेतले.ना. अहीर यांनी अटलजींच्या कार्याची माहिती दिली. माजी खासदार पुगलिया यांनीही आठवणींना उजाळा दिला. पक्षाच्या चौकटीत न मावनारे लोकनेते म्हणून अनेकांनी अटलजींचा उल्लेख केला. संचालन अरूंधती कावडकर, नासिर खान यांनी केले. या श्रध्दांजली कार्यक्रमाला चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, वरोरा, मूल आदी तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. त्यांनीही अटलजींच्या अस्थिकलशाचे घेतले.