शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात वैष्णवीची बाजी

By admin | Updated: April 20, 2017 01:37 IST

नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात लिखितवाडा येथील वैष्णवी नरेश बांगरे हिने सादर

प्रयोगाला मिळाला प्रथम क्रमांक : वनौषधीतून दंत्तमंजन, धुपबत्तीचे प्रात्यक्षिक गोंडपिपरी : नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात लिखितवाडा येथील वैष्णवी नरेश बांगरे हिने सादर केलेल्या प्रयोगाला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. दुर्धर आजार असलेल्या शिक्षकाच्या मदतीने तिने हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी काही कमी नाही. आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करुन त्यात ते यश मिळवू लागले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील सातवीची विद्यार्थिनीने वैष्णवीने हे सिद्ध केले आहे. सांगली येथे ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. त्यात गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि.प. उच्च प्राथमिक शाळा लिखितवाडा येथील सातवीत शिकणाऱ्या वैष्णवी बांगरे हिने आपला प्रयोग सादर केला. तिने शिक्षक एस. आर. मिरदोड्डीवार यांच्या मार्गदर्शनात ‘नैसर्गिक वनौषधीपासून निर्मिती धूपबत्ती, अगरबत्ती व दंतमंजन’, हा प्रयोग सादर करुन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या जंगलातील विविध प्रकारच्या वनऔषधी मानवासाठी उपयुक्त आहेत. या वनऔषधीचा मानवी जिवनाला मोठा लाभ घेता येऊ शकतो या उद्देशाने वैष्णवीने प्रयोग तयार केला. त्यातून दंतमंजन, धुपबत्ती व अगरबत्तीची निर्मितीचे प्रात्यक्षि दाखविले. तिच्या या प्रयोगाला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक मिळाला. गेल्या काही वर्षांपासून शिक्षक एस आर. मिरदोड्डीवार यांना दुर्धर आजार जडला आहे. मात्र त्यांनी पराजय न मानता सातत्याने विद्यार्थी घडविण्याचे काम सुरु ठेवले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात लिखितवाडा शाळेला सलग तीन वेळा ‘इन्स्पायर्ड अवार्ड’ मिळाला आहे. वैष्णवी बांगरे हिच्या प्रयोगाला राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सरळ प्रवेश मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी) चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्यांदाच मान वैष्णवी बांगरे हिच्या प्रयोगाला विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. आदिवासी प्राथमिक गटातून चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला आहे. आता ती दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार आहे.