शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचे विचार घराघरांत पोहोचावे- सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 12:14 IST

चंद्रपूर : समाजाला घडविण्याचे महत्तम कार्य वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे विचार भजनांच्या , कीर्तनाच्या आणि ...

चंद्रपूर : समाजाला घडविण्याचे महत्तम कार्य वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे विचार भजनांच्या , कीर्तनाच्या आणि कृतीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचावे अशी अपेक्षा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. यावेळी श्याम नगरातील सर्व भजन मंडळांना भजन साहित्याचे वितरण करण्यात येईल, अशी घोषणाही ना. मुनगंटीवार यांनी केली. 

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती निमित्त स्वच्छता अभियान व समाज प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगरचे महामंत्री ब्रीजभूषण पाझारे, माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी गटनेता जयश्री जुमडे, माजी नगरसेवक महेंद्र जुमडे, अजय सरकार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, विजय चिताडे, अशोक ताटकंठीवार, रामभाऊ ढगे, किशोर घुसे, कविता जाधव, मनोज पोतराजे, आकाश मस्के, राजकुमार आकापल्लीवार, सुनिल डोंगरे आदी उपस्थित होते. 

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, संत गाडगे महाराज स्वच्छतेचे व्रत घेऊन प्रबोधन करायचे. आध्यात्मासोबत समाजाला कृती आचरणात कशी आणावी याची शिकवण वैराग्यमूर्ती गाडगे बाबांनी दिली. गाडगे बाबांनी केवळ समाजातच स्वच्छतेचा संदेश दिला नाही तर माणसाला आत्मिक स्वच्छतेचाही संदेश दिला आहे. मानवतेचा धर्म त्यांनी समाजाला शिकविला. १६ मार्च १९९५ ला आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर संत, महंतांच्या सेवेला प्राधान्य दिल्याचे नमूद करीत ना. मुनगंटीवार यांनी नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अमरावती विद्यापीठाचा नामविस्तार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ करण्याचे सौभाग्य आपल्याला लाभल्याचे  सांगितले. 

शिखर शिंगणापुरात १ हजार २०० बेलवृक्षांचे संवर्धन करण्याचे सौभाग्य आपल्याला वनमंत्री म्हणून लाभल्याचे सांगत ना. मुनगंटीवार यांनी अशा कार्यांच्या माध्यमातून प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडावे असे आवाहन केले. भीमाशंकर, औंढानागनाथ, पंढरपुरातील तुळशी वृंद्धावनाचा कायापालट आपल्या हातून झाल्याचाही मनस्वी आनंद वाटतो असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. श्रीक्षेत्र माता महांकाली, श्रीक्षेत्र भगवान मार्कडेश्वराचाही कायापालट लवकरच होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. संतांना जातीत विभागू नका 

समाजातील काही स्वार्थी वृत्तीने संतांनाही जातीपातीत विभागाणे सुरू केले आहे. संत जन्मत:च महान असतात. त्यांना जातीच्या जोखडांमध्ये जकडण्याचे पाप कुणी करु नये, असे भावनिक आवाहन करीत ना. मुनगंटीवार यांनी सामाजिक एकोप्याचा संदेश कार्यक्रमात दिला.

नारीशक्तीचा जागर 

कार्यक्रमादरम्यान ना. मुनगंटीवार यांनी नारीशक्तीचा जागर केला. महिला सहनशील आहेत परंतु शक्तीशाली आहेत. सृष्टी सृजनाचे कार्य मातृशक्तीशिवाय अपूर्ण आहे,असे कार्यक्रमात नमूद केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार