शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

चार लाख ८१ हजार जनावरांना लाळखुरकत लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

शेतीला पूरक म्हणून शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून जनावरे पाळण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून काही शेतकºयांनी दुधाळी जनावरेही घेतली. या जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकते. हे लक्षात घेऊन लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जि. प. पशुसंवर्धन विभागाची १५ वी फेरी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जनावरांमध्ये आढळणाºया लाळखुरकत या संसंर्गजन्य गंभीर आजाराच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची १५ वी फेरी राबविण्यात आली. या फेरी अंतर्गत ३० ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्यातील चार लाख ८१ हजार २१७ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.शेतीला पूरक म्हणून शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून जनावरे पाळण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून काही शेतकºयांनी दुधाळी जनावरेही घेतली. या जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकते. हे लक्षात घेऊन लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात आला. विशेषत: लाळखुरकत आजाराला प्रतिबंध केला नाही तर जनावरे दगावण्याचा धोका आहे. लाळखुरकत हा गंभीर आजार असून यालाच ग्रामीण भागात लाळे, पायखुरी व तोंडखुरी असेही म्हटले आहे. या आजारामध्ये तोंड व खुरात जखमा होतात. जनावर चारा खाणे बंद करतात. तोंडातून लाळ गळते, जनावरे चालताना लंगडतात, ताप येतो, थकवा जाणवतो व धाप लागते. यावर उपचार न झाल्यास जनावर मृत्यूमुखी पडण्याचा धोका आहे. शेतीच्या हंगामाची जनावरांचे कधी-कधी स्थलांतरही होते. अशा स्थलांतरीत जनावरांमुळे लाळखुरकत रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त वाढते. यावर तातडीने प्रतिबंध घातला नाही तर शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायाचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ होते. या रोगाला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून १५ व्या फेरी अंतर्गत ३० आॅक्टोबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत श्रेणी- १ चे ३१, २ चे ११८ केंद्र तसेच ६ फिरत्या पशुचिकित्सा अशा १५५ केंद्रांत लाळ्खुरकतची लस उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ४ लाख ८१ हजार २१७ जनावरांचे यशस्वी लसीकरण करणे शक्य होऊ शकले.अशी घ्यावी जनावरांची काळजीसध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत आहे. दिवसा कडक उन्ह तर सकाळी व रात्रभर कडाक्याची थंडी जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे जनावरांच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होण्याचा संभव असतो. त्यामुळे योग्य पद्धतीचे खाद्य आणि स्वच्छ पाण्याबरोबरच जनावरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाळीव जनावरांना विशेषत: गाय, बैल, म्हशीला तोंड व पायांना जखमा होऊन लाळखुरकत रोगाची लागण होते. रोगाच्या प्राथमिक टप्यात जनावर अशक्त होते. खाद्यावरची त्याची इच्छा नाहीशी होते, अशी माहिती पशु चिकित्सकांनी दिली.उत्तम शेती करण्यासाठी पाळीव जनावरांची गरज आहे. शेतकºयांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी या जनावरांचा मोठा लाभ होतो. परंतु जनावरांचे आरोग्य बिघडल्यास याचा अनिष्ट परिणाम शेतकºयांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची १५ वी फेरी जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवण्यात आली.- डॉ. अविनाश सोमनाथे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. प.

टॅग्स :doctorडॉक्टर