शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:53 IST

चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील प्राध्यापक, विशेषज्ज्ञ, अधिपरिचारिका आदी पदे रिक्त असल्याने वैद्यकीय शिक्षण व ...

चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील प्राध्यापक, विशेषज्ज्ञ, अधिपरिचारिका आदी पदे रिक्त असल्याने वैद्यकीय शिक्षण व रूग्ण्सेवेवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत पुरवणी विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्यान केली.

विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनांची शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२०२० चे प्रलंबित तसेच थकित शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळण्याबाबत विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापन संघटनेने शासनाकडे मागणी केली आहे. विनाअनुदानित संस्था आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. सहा महाविद्यालयांना शासनाकडून मिळणारी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९- २०२० चे प्रलंबित तसेच थकित शिक्षण शुल्काची रक्कम तसेच कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थांना मिळणे दुरापास्त झाले आहे. शिक्षण शुल्काची प्रतिपूर्तीची रक्कम प्रलंबित असल्यामुळे कर्मचाºयांचे मागणी ५ ते ६ महिन्याचे वेतन अदा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रलंबित शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्यान केली. या मुद्यांच्या अनुषंगाने कार्यवाहीचे निर्देश देण्यातचे आश्वासन उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. राजुरा तालुक्यातील विहिरगाव व मूर्ती येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड विमानतळासाठी वनजमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याची मागणीही आ. मुनगंटीवार यांनी चर्चेदरम्यान केली.