शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांकडून १८५३ वेळा टोल फ्रीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:55 IST

सध्या निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. राजकीय मंडळी गावे, शहरे पिंजून काढीत असतानाच प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदारांच्या तक्रारी राहू नयेत, यासाठी निवडणूक विभागाने विविध पाऊल उललले आहेत.

ठळक मुद्देमतदारांचा उत्तम प्रतिसाद : भाजपा ५१, काँंग्रेसविरोधात १० तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. राजकीय मंडळी गावे, शहरे पिंजून काढीत असतानाच प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना मतदारांच्या तक्रारी राहू नयेत, यासाठी निवडणूक विभागाने विविध पाऊल उललले आहेत. मतदारांना सहजरीत्या संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करता यावे, यासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील काही दिवसात या टोल फ्री क्रमांकावर तब्बल १ हजार ८५३ फोन कॉल आले असून अनेक मतदारांना शंकेचे निरसन केले आहे. विशेष म्हणजे, या नंबरवर काहींनी तक्रारही केल्या आहे. यामध्ये भाजपाविरुद्ध ५१, तर काँग्रेसविरुध्द १० तक्रारींचा समावेश आहे.जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभा मतदार संघातील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. मतदार यादीत आपले नाव आहे का? असेल, तर नावामध्ये काही चुका आहे का? याची माहिती मतदारांना घरबसल्या घेता यावी, यासाठी निवडणूक विभागाने टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या या क्रमाकांवर येणाऱ्या फोन कॉलची संख्या वाढली आहे.ही सेवा २४ तास सुरु आहे. आजवर या टोल फ्री क्रमांकावर तब्बल १ हजार ८५३ जणांनी फोन कॉल करुन आपल्या शंका, अडचणी मांडल्या आहेत. १९५० या क्रमांकावर मतदारांनी नोंदविलेल्या प्रत्येक शंकेचे निसरन करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.अधिकारी, कर्मचारीही करताहेत फोन कॉलमतदार टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदार यादीमध्ये आमचे नाव आहे का? नवीन आॅनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे का? आमचे मतदान ओळखपत्र मिळाले नाही, नाव दुरुस्ती करता येईल का? आॅनलाईन फॉर्म कसा भरावा? असे विविध प्रश्न मतदार विचारत आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारीही टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन इलेक्शन ड्युटीचा भाग क्रमांकासह विविध माहिती घेत आहेत.केंद्राबाबत विचारणाग्रामीण भागातील मतदारांना मतदार केंद्र शोधण्याची गरज पडत नाही. परंतु शहरातील एकाच भागात अनेक मतदान केंद्र असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या केंद्रावर आपले मतदान आहे? याची अनेकांना माहिती नसते. याच अनुषंगाने विशेषत: शहरी भागातील मतदार आमचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे, अशी विचारणा १९५० क्रमांकावर करीत आहेत.तातडीने रिस्पॉन्सग्रामीण अथवा शहरी भागातील मतदारांनी टोल फ्री क्रमांकावर फोन कॉल केल्यानंतर संबंधित मतदाराला उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तातडीने रिस्पॉन्स दिला जात आहे.त्यामुळेच मागील काही दिवसात फोन कॉलची संख्या वाढली आहे.१९५० वर ७१ तक्रारी१९५० या नंबरची सेवा सुरु केल्यांनतर नागरिक सतर्क झाले आहे. त्यानुसार नागरिक या नंबरवर तक्रारसुद्धा करीत आहे. यामध्ये ७१ तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे, या तक्रारींपैकी तब्बल ५१ तक्रारी भाजपाविरुद्ध, तर १० तक्रारी काँग्रेसविरुद्ध आहे. अन्य १० तक्रारी विविध अपक्ष उमदेवारांविरुद्ध आहे.शंकेचे निरसनदोन महिन्यापूर्वी सुरु केलेल्या या सहाय्यता नंबरवर आचारसंहितेपूर्वी म्हणजे १० मार्च पूर्वी केवळ ३४९ कॉल आले होते. आचारसंहितेनंतर यात वाढ झाली. १ एप्रिलपर्यंत तब्बल १८५३ जणांनी कॉल करुन शंकेचे निरसन करुन घेतले.जिल्ह्यात प्रथमच हा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तक्रारीसुद्धा या नंबरवर घेण्यात येत आहे. या नंबरचा मतदारांना लाभ होत आहे.- संजय डांगे, सहाय्यक, जिल्हा मदत केंद्र.