शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण कमी करण्यासाठी मूल शहरात सौर ऊर्जेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

मूल : दिवसेंदिवस विद्युतच्या वापराने प्रदूषण मानवजातीसाठी घातक परिणाम करणारे ठरत आहे. त्यावर उपाय म्हणजे जास्तीत जास्त सौर ...

मूल : दिवसेंदिवस विद्युतच्या वापराने प्रदूषण मानवजातीसाठी घातक परिणाम करणारे ठरत आहे. त्यावर उपाय म्हणजे जास्तीत जास्त सौर उर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. हे हेरुन मूल शहरात प्रथमच गांधी चौकात सौर उर्जेचे वाहतूक सिग्नल लावण्यात आले. हे सिग्नल व्यवस्थित सुरू असल्याने सौर उर्जेचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. यासाठी नगर परिषदेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात असल्याने सौर ऊर्जेचा वापर अधिकाधिक वाढला असून, मूल शहरात दुकाने, घरात, कार्यालय, राईस मिल आदी ठिकाणी सौर ऊर्जा संच बसविण्यात आला आहे. त्यामुळे प्रदूषणावर काही प्रमाणात आळा बसणार आहे.

प्रदूषण ही फार मोठी समस्या असून, दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. विद्युतचा वापर घरापासून तर कारखान्यापर्यंत केला जातो. यात होणारी स्पार्किंग असो की जास्त दाबामुळे जळणारे ट्रान्स्फार्मर असो यामुळे सर्वत्र प्रदूषण पसरत असते. यासाठी सौर ऊर्जावर चालणारी विद्युतवाहिनीचा वापर करणे आवश्यक ठरते. हे हेरुन मूल शहरात घरगुतीपासून तर औद्योगिक कामासाठी सौर ऊर्जाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. प्रदूषण वाढू नये यासाठी शासनाने प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. मात्र आडमार्गाने काही प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. हा वापर बंद होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच दुचाकीऐवजी सायकलचा वापर झाल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.