शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेवा हक्क कायद्याचा वापर सर्वसामान्यांमध्ये रुजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:00 IST

सामान्य जनतेमध्ये पारंपारिक पद्धतीने काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे. त्यामुळे आॅनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायदयाच्यामार्फत सर्व सामान्य जनतेला वळविताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे व ही यंत्रणा पूर्णता कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदलणारे प्रशासन याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेला झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.

ठळक मुद्देस्वाधीन क्षत्रिय : जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सामान्य जनतेमध्ये पारंपारिक पद्धतीने काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे. त्यामुळे आॅनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायदयाच्यामार्फत सर्व सामान्य जनतेला वळविताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे व ही यंत्रणा पूर्णता कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदलणारे प्रशासन याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेला झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये त्यांनी लोकसेवा हक्क आयोगाच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रत्येक कार्यालयात कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते, याबाबतचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सुरुवातीला सादरीकरण केले.जिल्ह्यांमध्ये वरोºयापासून सुरू झालेल्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यामध्ये प्रशासकीय सेवा प्रदान करताना झालेले बदल व आलेल्या अडचणी याबाबतची मांडणी केली. यानंतर प्रत्येक विभागाने सेवा हक्क आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काम करताना नागरिकांना सुविधा देताना येत असलेल्या अडचणी बाबतही माहिती दिली. तर विविध विभागांच्या आॅनलाईन अंमलबजावणीमध्ये येणाºया अडचणीबाबत आयुक्तांनी बैठकीमध्ये माहिती जाणून घेतली.५०० सेवांची सुविधा मिळणारलोकसेवा हक्क कायद्यान्वये आगामी काळात ५०० सेवांची सुविधा सामान्य नागरिकांना प्रत्येक केंद्रावर दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २२ लाख लोकांना जवळपास १ हजार केंद्राच्या माध्यमातून विविध सुविधा पोहोचविल्या जातात. यामध्ये सेतू केंद्र, सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र यांचा समावेश आहे.