नानाबाई रो मायरो : जयाकिशोरीजी यांचे प्रतिपादनचंद्रपूर : कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी पैसा कमाविणे योग्य आहे. मात्र सुख-समुध्दी नाहिशी होतपर्यंत धनाचा लोभ करणे व त्याच्या मागे धावणे योग्य नाही. गरजवंताला मदत केली तर आपणाला आनंद मिळतो. त्यामुळे धनसंपत्तीला चांगल्या कामात वापरा, असा मोलाचा सल्ला राधास्वरुप पूज्य जया किशोरीजी यांंनी दिला.माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळच्या वतीने येथील न्यू इंग्लिश हॉयस्कूलच्या पटांगणावर आयोजित ‘नानीबाई रो मायरो’ या कथात्मक कार्यक्रमाच्या आज दुसऱ्या दिवशी पूज्य जया किशोरीजी यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे संसार अतिव्यस्ततेकडे जात आहे. त्यामुळे संसार भक्तीच्या मार्गापासून अलिप्त होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने मोबाईल दिला. मात्र या मोबाईलमुळे सर्वच स्वत: अति व्यस्त करून टाकत आहे. परिणामी आपणाला आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. यावेळी पूज्य जया किशोरीजी यांनी संत नरसी मेहता यांची कथा ऐकविली. या कथेत दान देणे म्हणजेच जीवनात सुख, शांती व आनंद मिळविणे आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे गरीब, विकलांग लोकांना नेहमी सहकार्य करा, असेही त्यांनी सांगितले. भगवान श्रीकृष्णांची लिला अपरंपार आहे, याची जाणीव आपणाला असायला पाहिजे. प्रतिदिन आपण त्यांच्या भक्तीरसात लिन झालो पाहिजे. असे झाले तर आयुष्यातील अनेक दु:ख कमी होईल, असेही पूज्य जया किशोरीजी यांनी सांगितले. याप्रसंगी जया किशोरीजी यांनी गायलेल्या भजनात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. यावेळ मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
धनसंपत्तीला चांगल्या कामात वापरा
By admin | Updated: November 24, 2014 22:55 IST